जगातील अजब दफनभूमी
फॉहर-एमरुम नावाचे एक बेट जर्मनी असून येथील दफनभूमीत थडग्यांवर लावण्यात आलेले ग्रेवस्टोन म्हणजेच दगड हे खास ठरले आहेत. कारण अन्य दफनभूमींमध्ये जे ग्रेव्हस्टोन असतात, त्यावर केवळ मृताचे नाव, जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख नमूद असते. परंतु जर्मनीच्या या बेटावरील दफनभूमीत ग्रेव्हस्टोनवर मृताशी निगडित एखादी कहाणी, किस्सा किंवा खास गोष्टी लिहिण्यात आल्या आहेत. या कारणामुळे या ग्रेव्हस्टोन्सनला टॉकिंग ग्रेव्हस्टोन्स म्हटले जाते. दगडांवर कहाणी लिहिण्याची परंपरा 17 व्या शतकात सुरू झाली होती. येथे दफन बहुतांश लोक खलाशी होते, ज्यांच्याकडे स्वत:च्या जीवनाशी निगडित अनेक रोमांचक किस्से असायचे. जर्मनीच्या पश्चिम किनाऱ्याच्या उत्तरेच्या दिशेला दोन बेटं असून तेथे टॉकिंग ग्रेव्हस्टोन्सच्या परंपरेचे पालन केले जाते. बेटावरील अनेक दफनभूमींमध्ये हा प्रकार दिसून येतो. 17 व्या शतकात हे बेट एक मोठे व्हेलिंग सेंटर ठरले होते. म्हणजेच या ठिकाणी व्हेलमासे पकडले जात होते. डच आणि इंग्लिश जहाजे येथूनच जायची, ती या बेटावर थांबत होती. येथील स्थानिक लोकांना ते जहाजांवर नियुक्त करायचे. अनेकदा या गावातून 12 वर्षांपर्यंतच्या छोट्या मुलांना देखील नोकरीवर ठेवले जायचे आणि स्वत:सोबत व्हेल पकडण्यासाठी नेले जायचे. जेव्हा हे लोक या बेटावर परतायचे तेव्हा त्यांच्याकडे समुद्राशी निगडित अनेक कहाण्या असायच्या. याच कहाण्यांना संबंधितांच्या ग्रेव्हस्टोनवर कोरले जात होते. अनेक ग्रेव्हस्टोन्समध्ये संबंधिताची जन्मतारीख, वय, मृत्यूची तारीख, पती-पत्नी, मुलांचे नाव, अणि त्यांचे किस्से लिहिले जात होते. अनेकदा लिहिण्यासाठी अनेक गोष्टी असल्यास ग्रेव्हस्टोनच्या मागील बाजूलाही मजकूर कोरला जात होता. तर गरीब लोकांचे ग्रेव्हस्टोन रेड सँड स्टोनने तयार केले जात होते, तर श्रीमंत लोकांचे ग्रेनस्टोन सोन्याने देखील तयार केले जात होते.