जगातील सर्वात लांब कुर्ता
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सथान
भारतात जेव्हा एखादा सण असतो, तेव्ह लोक कुर्ता घालणे पसंत करतात. सध्या एक कुर्ता जगभरात चर्चेत आला आहे. हा जगातील सर्वात लांब कुर्ता आहे. या कुर्त्याची नोंद आता गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे.
या कुर्त्याची लांबी 66 फूट 7 इंच असून तो 27 फूट 6 इंच रुंदीचा आहे. इतका मोठा आकार असल्याने हा कुर्ता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कुर्ता घालणारा इसम कुठून आणणार असा प्रश्न लोक आता सोशल मीडियावर उपस्थित करत आहेत. या कुर्त्याचा व्हिडिओ गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या कुर्त्याची निर्मिती इराणच्या बयाती रियल इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीने केली आहे. भारतात आपण ज्याला कुर्ता असे संबोधितो, त्याला इराणमध्ये थोबे म्हटले जाते. हा कुर्त्यासारखाचा असतो, परंतु त्याचे स्वरुप काहीसे वेगळे असते. थोबे एक प्रकारचे कापड असते जे कुर्त्याप्रमाणेच स्टेंड कॉलर आणि कट्सयुक्त असते. यात गळ्यानजीक तीन बटनं असतात.
जगातील सर्वात लांब कुर्त्याचे डिझाइन देखील खास आहे. करड्या रंगाचा हा कुर्ता पाहण्यास आकर्षक आहे. यापूर्वी जगातील सर्वात मोठा कुर्ता 2019 मध्ये पाकिस्तानच्या सैयद चांद शाहने तयार केला होता, जे सुमारे 12 फूट 6 इंच लांबीचा होता.