कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातमध्ये ‘सूर्यनमस्कारा’चा विश्वविक्रम

06:19 AM Jan 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकाचवेळी 4 हजार जणांनी केला सूर्यनमस्कार : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी कामगिरी

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

नव्या वर्षात गुजरातने गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदविले आहे. गुजरातच्या मोढेरा सूर्य मंदिरात सोमवारी सकाळी सूर्यनमस्कार कार्यक्रम झाला, ज्यात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि गृहमंत्री हर्ष संघवी यांनी देखील भाग घेतला. यावेळी 4 हजारांहून अधिक लोकांनी सूर्यनमस्कार केला आहे. नव्या वर्षाच्या सूर्योदयासोबतच राज्याने गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदविले आहे.

मोढेरा येथील सूर्य मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येत लोकांनी भाग  घेतला आहे. यावेळी गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे निरीक्षक स्वप्नील डांगरीकर देखील उपस्थित होते. सूर्यनमस्कार करणाऱ्या सर्वाधिक लोकांच्या विक्रमाची सत्यता  पडताळून पाहण्यासाठी ते पोहोचले होते. यापूर्वी अशाप्रकारचा विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न कुणीच केला नव्हता.

गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सचे निरीक्षक स्वप्नील डांगरीकर यांनी गुजरताने स्वत:च्या नावावर विश्वविक्रम केला असल्याची अधिकृत घोषणा केली. तर गुजरातच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला गेल्यावर गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी आनंद व्यक्त केला आहे.  गुजरातने सर्वाधिक लोकांकडून सूर्यनमस्कार करण्याचा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. आज 108 ठिकाणांमध्ये एकाचेळी सर्वाधिक संख्येत लोकांकडून सूर्यनमस्कार करण्यात आले आहेत. योगला जगभरात स्वीकारले जात असल्याचे सांघवी म्हणाले.

या विश्वविक्रमी कामगिरीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पोस्ट शेअर केली आहे. आमच्या संस्कृतीत 108 अंकाचे विशेष महत्त्व असल्याचे आम्ही सर्व जण जाणतो. हा विश्वविक्रम म्हणजे योग आणि आमच्या सांस्कृतिक वारशाबद्दल आमच्या प्रतिबद्धतेचा खरा पुरावा आहे, असे मोदींनी नमूद केले आहे. पंतप्रधानांकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये प्रतिष्ठित मोढेरा सूर्य मंदिर देखील सामील आहे. सूर्य नमस्काराला लोकांनी स्वत:च्या दिनचर्येचा हिस्सा करावे. याचे अनेक लाभ असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हजारो लोकांचा सहभाग

1 जानेवारी रोजी सकाळी 108 ठिकाणी आणि 51 विविध श्रेणींमध्ये 4 हजारांहून अधिक लोकांनी या सूर्य नमस्कार योग कार्यक्रमात भाग घेतला आहे. राजसी मोढेरा सूर्य मंदिरात आयोजित या विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या कार्यक्रमात अनेक परिवार, विद्यार्थी आणि योगप्रेमी तसेच ज्येष्ठ नागरिकांसमवेत विविध समुहांनी भाग घेतला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article