8008 वेळा पूल-अप्स करून विश्वविक्रम
ऑस्ट्रेलियाच्या युवकाची कामगिरी
जगात अनेकदा कुणी ना कुणी विश्वविक्रम करत असतो. कुणी स्वतःचे नाव इतिहासात नोंदविण्यासाठी अशी कामगिरी करत असतो, परंतु काही जण इतरांची मदत करण्यासाठी प्रचंड मेहनत करत असतात. एका अशाच युवकाने गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन करण्यास यश मिळविले आहे. या युवकाचा उद्देश प्रसिद्धी मिळविणे नव्हता तर दुसराच होता.
ऑस्ट्रेलियातील जॅक्शन इटालियानोने आजारी लोकांच्या उपचारासाठी चॅरिटीची सुरुवात केली आणि यासाठी त्याने इतके पूलअप्स केले की गिनिज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नावच नोंद झाले. बारवर लटकून त्याच्या हाताला फोड आले होते. जॅक्सनने एका दिवसात 8,008 वेळा पूलअप्स केले आहे.
प्रचंड कसरत करणारे लोकही 10, 20 किंवा 50 हून अधिक पूलअप्स एकाचवेळी करू शकत नाहीत. परंतु जॅक्सनने हाताला फोड आले तरीही दिवसभरात 8008 पुल-अप्स एका दिवसात करून विक्रम नोंदविला आहे.
डिमेन्शिया पीडितांना मदत
8,008 पुल अप्स करण्यासह जॅक्सनने 5,900 च्या पुल-अप्सचा विक्रम मोडीत काढला आहे. ऑस्ट्रेलियन युवकानुसार पुल अप्सचा विक्रम करण्यामागील उद्देश चॅरिटी आहे. जॅक्शन डिमेन्शिया पीडित रुग्णांच्या उपचारासाठी निधी उभारू इच्छितो. मी प्रत्येक पुल अपसोबत एक डॉलर निधी जमविण्याचा प्रयत्न करत आहे. या रकमेतून डिमेन्शियाला पराभूत करण्याचा प्रयत्न असल्याचे जॅक्सनने म्हटले आहे.