For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजपासून जागतिक ‘पर्पल फेस्त’

12:39 PM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजपासून जागतिक ‘पर्पल फेस्त’
Advertisement

आठ हजार दिव्यांगजनांचा सहभाग : दिव्यांगजनांचा वैशिष्ट्यापूर्ण उपक्रम

Advertisement

पणजी : राज्यात आजपासून सुऊ होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ‘पर्पल फेस्त’ महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, देशातील व राज्यातील नामवंत कलाकारांचे सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. आज 8 ते 13 जानेवारी या कालावधीत हा महोत्सव होणार असून जगभरातून तब्बल आठ हजार दिव्यांगजन उपस्थिती लावणार आहेत. विविध नामवंत कलाकारांसोबत गोव्यातील दिव्यांग विद्यार्थी व नागरिक आपले कलागुण प्रदर्शित करणार आहेत. राज्य दिव्यांगजन आयुक्तालय व गोवा सरकार यांच्यामार्फत आयोजित केलेल्या  या महोत्सवाचे उद्घाटन आज सोमवारी संध्याकाळी साडेचार वाजता कांपाल येथील दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर मैदानावर होणार आहे.

‘पर्पल गीत’ ठरणार आकर्षण

Advertisement

जगभरातून आठ हजार दिव्यांगजन प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यामुळे हा वैश्विक तसेच सर्वसमावेशकतेचा जागतिक सोहळा ठरणार आहे. धम्माल हे पर्पलगीत उद्घाटन सोहळ्याचे आकर्षण ठरणार असून या गीताचे वैशिष्ट्या म्हणजे गोव्यातील दिव्यांगजनानी भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांच्या समवेत हे गीतगायन व सादरीकरण केले आहे. संगीत दिग्दर्शक मन्नन शाह यांनी याचे दिग्दर्शन केले दिली.

रामदास आठवले प्रमुख पाहुणे

प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्य पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, खास निमंत्रित म्हणून मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल उपस्थित राहणार आहेत.

सुदेश भोसले, खैलास खेर

या सहा दिवशीय महोत्सवात गायक सुदेश भोसले, कैलास खेर, तसेच कार्तिक कृष्णमूर्ती, दिवाकर शर्मा, डान्सर विकास सावंत आणि गट, विक्ट्री आर्ट फाऊंडेशन, नव उत्थान संघ, फ्लोविंग कर्मा बँड, कमलेश पटेल, सुशांत दिगवीकर, आदीसह इतर दिव्यांग कलाकारांचे दररोज सायंकाळी 7 ते 10 या वेळेत कार्यक्रम होणार आहेत. यामुळे दिव्यांग नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळणार आहे. गायक सुदेश भोसले हे गोमंतकीय दिव्यांग मुलांसोबत 11 जानेवारी रोजी सादरीकरण करणार आहेत. जिज्ञासा या गोमंतकीय गायन कलापथकांसोबत गोव्यातील दिव्यांग विद्यार्थी कलाकार 13 जानेवारी रोजी नृत्य सादर करणार आहेत.

मुंबई-गोवा सायकलने प्रवास

या महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी मुंबई ते गोवा असा 40 तासांचा उल्लेखनीय केला. प्रवासात दिव्यंगत्वावर मात करत या सहा साहसी सायकलपटूंच्या गटाचे काल तीन टॅंडम सायकलवरून गोव्यात आगमन झाले. काल सकाळी कांपाल येथील दयानंद (भाऊसाहेब) बांदोडकर मैदानावर आगमन झाल्यानंतर समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई आणि गोवा राज्य दिव्यांगजन आयुक्त गुऊप्रसाद पावसकर यांनी सायकलपटुंची भेट घेऊन स्वागत केले.

Advertisement
Tags :

.