For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पूजा शर्माला अटकपूर्व जामिनास नकार

12:56 PM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पूजा शर्माला अटकपूर्व जामिनास नकार
Advertisement

अहवालावर उत्तर देण्यास दिली वेळ : सुनावणी शुक्रवार दुपारपर्यंत स्थगीत,समन्सच्यावेळी पूजा होती हिमाचलमध्ये,आगरवाडेकर घर जमिनदोस्त प्रकरण

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडल्याचा आरोप असलेली मुख्य  संशयित पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन देऊन ‘संरक्षण’ देण्यास पणजीच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयाने काल बुधवारी नकार दिला आहे. पोलिसांनी सादर केलेल्या लांबलचक अहवालाला उत्तर देण्यासाठी शर्माच्या वकिलाला वाढीव वेळ देण्याची मागणी न्यायालयाने मान्य करून सुनावणी शुक्रवार दुपारपर्यंत स्थगित ठेवली आहे. राज्यभर सध्या गाजत असलेल्या आसगाव  येथील आगरवाडेकर कुटुंबाचे घर पाडल्याप्रकरणी पूजा शर्मा हिचा अटकपूर्व जामीन अर्ज काल बुधवारी दुपारी पणजीच्या प्रधान जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणीसाठी आला. यावेळी शर्मा हिचे वकील सुरेश लोटलीकर यांनी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

पूजा शर्मा होती हिमाचलमध्ये

Advertisement

रविवारी क्राईम ब्रांचने फौजदारी कायद्याच्या कलम 41 (अ) खाली पाठवलेल्या समन्सच्या वेळी पूजा शर्मा हिमाचल प्रदेशमध्ये असल्याने त्यांनी उत्तर देताना, सोमवारी चौकशीसाठी येणे शक्य नसल्याचे कळविले होते. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात वेळ देण्याची विनंती केली होती. सदर विषय प्रसारमाध्यमांनी देशभर उचलून धरल्याने त्यावर चर्चा वाढत असल्याचा दावा लोटलीकर यांनी केला.

उत्तर देण्यासाठी वाढीव वेळ द्यावी

चौकशीच्या नावाखाली अटक होण्याच्या भीतीमुळे अटकपूर्व जामीन देऊन पूजा शर्मा यांना ‘संरक्षण’ देण्याची लोटलीकर यांनी मागणी केली. पोलिसांच्या तपास अधिकाऱ्याने न्यायालयात दाखल केलेले उत्तर बुधवारीच दुपारी मिळाले असल्याने आणि ते लांबलचक असल्याने त्यावर उत्तर देण्यासाठी वेळ देण्याची त्यांनी विनंती केली. सुनावणी पूर्ण होईपर्यंत पूजा शर्मा हिला पोलिसांपासून वाचवा, अशी विनंतीही लोटलीकर यांनी केली.

न्यायालयाने याचिकादाराचे म्हणणे ऐकून आणखी वाढीव वेळ देताना शुक्रवारी सुनावणीची तारीख ठरवली. तसेच, अटकपूर्व जामिनासाठी अर्ज न्यायालयात दाखल झाला की आपोआप अर्जदाराला पोलिसांकडून अटक होण्यापासून संरक्षण मिळत असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने जाहीर केला.

आसगावच्या जागेसाठी शर्मा हिने फेडले 1. 68 कोटी

पूजा शर्मा हिचे वकील सुरेश लोटलीकर यांनी सुनावणी नंतर पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की आपल्या अशिलावर केलेले आरोप खोटे असून शर्मा यांचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. शर्मा या जागेची मालकीण असून कोणीतरी मुद्दामहून अडचण आणण्याचा प्रयत्न केला आहे. सदरची जागा शर्मा हिने सुमारे 1. 68 कोटी फेडून खरेदी केली आहे. सध्या त्या मुबंईत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Advertisement
Tags :

.