32 गावांसाठी धावले जागतिक मॅरेथॉनपटू
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
12 जानेवारी रोजी येथे आयोजित लोकमान्य मॅरेथॉन 2025 हा आरोग्य, एकता आणि प्रेरणा देणारा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळी 6 वाजता वॉर्मअप सत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यामध्ये युवा, आबालवृद्धांसह भारतातील विविध राज्यातील व आंतरराष्ट्रीय धावपटूं सहभागी झाले होते.
सकाळी 6.30 वाजता टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झा, तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक, लोकमान्य सोसायटीचे संस्थापक चेअरमन डॉ. किरण ठाकुर, एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडीअर जॉयदीप मुखर्जी, माजी आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार शशिकला जोल्ले, रमाकांत कोंडुसकर, मलगौडा पाटील, अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, पंढरी परब, सई ठाकुर-बिजलानी, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले, कर्नल दीपक गुरुंग आदी मान्यवरांच्या हस्ते 10 कि.मी., 5 कि.मी., 3 कि.मी. मॅरेथॉनचे ध्वज उंचावून उद्घाटन करण्यात आले.
या स्पर्धेत सुमारे 3 हजारांहून अधिक मॅरेथॉनपटूंनी सहभाग दर्शविला. 32 गावांतील नागरिकांना शिक्षण, आरोग्य व इतर सुविधांसाठी लोकमान्य व लोककल्पच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातात. त्यामुळे लोकमान्य मॅरेथॉनला उत्तम प्रतिसाद मिळाला. पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. किरण ठाकुर यांनी सानिया मिर्झाचे स्वागत केले. ते म्हणाले, ही मॅरेथॉन बेळगावच्या ऐतिहासिक भूमीवरील पहिली महत्त्वाची स्पर्धा आहे. त्यांनी बेळगाव शहराचे ‘हिल स्टेशन’ म्हणून वर्णन करताना कित्तूर राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा आणि अन्य स्वातंत्र्यसैनिकांसह आपल्या वडिलांची, बाबुराव ठाकुर यांची आठवण केली. डॉ. किरण ठाकुर यांनी बेळगावच्या घ्उऱ्ध्ळ, Rण्ळ आणि न्न्ऊळ यासारख्या उच्चशिक्षण संस्थांची ओळख करून देताना लोकमान्य सोसायटीच्या 29 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा उल्लेख केला. तसेच, त्यांनी सुरू केलेल्या लोककल्प फाऊंडेशनद्वारे ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी, उत्तम शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन कसे केले जात आहे, याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी सानिया मिर्झाचे आभार मानले.
टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झा यांनीही आपण पुन्हा बेळगावला येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बेळगाववासीयांनी मला जे प्रेम दिले ते मी कधीही विसरू शकणार नाही. मी पुन्हा एकदा बेळगावला येईन आणि येथे अधिक वेळ घालवेन, असा आश्वासनही त्यांनी दिले.
पुरस्कार वितरणावेळी व्यासपीठावर लोकमान्य सोसाटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर, टेनिससम्राज्ञी सानिया मिर्झा, उपाध्यक्ष अजित गरगट्टी, गजानन धामणेकर, पंढरी परब, सई ठाकुर-बिजलानी, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएफओ वीरसिंग भोसले आणि कर्नल दीपक गुऊंग यांच्या उपस्थितीत विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. लोकमान्य सोसायटीच्या संचालिका सई ठाकुर-बिजलानी यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि या कार्यक्रमासाठी प्रायोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.