For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात

10:03 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात
Advertisement

ठिकठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात : ‘झाडे लावा झाडे जगवा’चा दिला संदेश

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्याच्या विविध गावांमध्ये बुधवारी जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावागावातील प्राथमिक व कन्नड शाळा, विविध संस्था, संघ-संघटनांतर्फे ठिकठिकाणी वृक्षारोपण केले. ‘झाडे लावा झाडे जगवा’ असा संदेश यावेळी देण्यात आला. तालुक्मयातील काही दानशूर मंडळींनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गावांमधील शाळा व काही विद्यार्थ्यांना मोफत विविध प्रकारच्या रोपट्यांचे वितरण केले. काही संघ व संस्थांच्यावतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी सामूहिक पद्धतीने वृक्षारोपण केले. या दोन-तीन दिवसात ज्यांचे वाढदिवस झाले अशा काही तऊणांनी आपल्या वाढदिवसानिमित्त फळे व फुलांची रोपटी भेट देऊन एक पर्यावरण पूरक असा संदेश दिला. यंदा हवामानात कमालीचा बदल दिसून आला. उष्णतेमध्ये अधिक प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे गावागावातील खुल्या जागांमध्ये झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा, असे अनेकांनी विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या भाषणातून सांगितले.

Advertisement

नावगे मराठी शाळेत रोप लागवड

नावगे गावातील प्राथमिक मराठी शाळेच्या आवारात बुधवारी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करून हा दिवस साजरा करण्यात आला. शिक्षक विनायक पाटील यांनी पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक आर. पी. सुतार तसेच शिक्षक व एसडीएमसी कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त झाडे देणगी

पिरनवाडी येथील नगरपंचायतीचे वॉटरमन शहापूरकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त काही झाडे देणगी स्वरूपात दिली. या झाडांची लागवड नागेश शहापूरकर व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. तसेच शहापूरकर यांच्या या सामाजिक उपक्रमाचे गावात कौतुक करण्यात आले.

संतिबस्तवाड कन्नड शाळा

संतिबस्तवाड गावातील कन्नड शाळेत जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. क्लस्टरचे सीआरपी विक्रम यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच झाडे लावून लावलेली झाडे जगवण्यासाठी अधिक प्रमाणात प्रयत्न केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

यळेबैल प्राथमिक मराठी शाळा

यळेबैल येथील प्राथमिक मराठी शाळेमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा केला. बेळगुंदी क्लस्टर सीआरसी रेडेकर,एसडीएमसी अध्यक्ष राजाराम यळ्ळूरकर, प्रभारी मुख्याध्यापिका आर. आर. चिरमुरकर, विश्वजीत कांबळे व शिक्षक आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.