समाज कल्याण'मार्फत जागतिक जेष्ठ नागरिक छळ प्रतिबंध दिन साजरा
कोल्हापूर प्रतिनिधी
भारताच्या संविधानातील राज्य धोरणाची निदेशक तत्त्वा वरील अनुछेद 39 41 मध्ये ज्येष्ठ नागरिक सुस्थितीत असावा अशी तरतूद आहे जेष्ठ नागरिकांचे समाजातील स्थान विचारात घेता त्यांना वृद्धापकाळ चांगल्या तऱ्हेने घालवता यावा समाजामध्ये त्यांची जीवन सुसह्य व्हावे शारीरिक ,मानसिक आरोग्य सुस्थितीत राहावे वृदाप काळामध्ये त्यांच्या आर्थिक क्षमता कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने दिनांक 16. 6 .2004 रोजी राज्याची जेष्ठ नागरिक धोरण 2004 भाग एक जाहीर केले असून त्या अंतर्गत जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती कार्यरत आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्याची कार्य सदर समिती करत आहे असे प्रतिपादन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी जागतिक ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस कार्यक्रमात म्हटले आहे. महावीर कॉलेज कोल्हापूर या ठिकाणी आज वयोवृद्ध लोकांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते त्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमांमध्ये भारती विद्यापीठाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिनंदन मुके यांनी भारती हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांकरता राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच वैदय अनघा किनिंगे, चिकित्सा विभाग भारती विद्यापीठ भारतीय हॉस्पिटल कोल्हापूर यांनी भारतीय आयुर्वेदाचे महत्त्व उपचार पद्धती व योगाच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे जीवन सुखकार करणे बाबतची माहिती दिली.
सदर कार्यक्रम महावीर महाविद्यालय येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कोल्हापूर व महावीर महाविद्यालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. सचिन कांबळे, चित्रा शेंडगे, सचिन पाटील यांच्यासह महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी दिलीप पेठकर व ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.