Sangli News : चंदा वाघिणीने प्रादेशिक क्षेत्रात वळविला मोर्चा !
कोअर झोनमधून बाहेर पडून चंदा वाघिण वाड्यांमध्ये
वारणावती : चंदा वाघिणीने कोअर झोनमध्ये सोडण्यात आले होते. कोअरमधून बफरमध्ये आली. आता तर तिने आपला मोर्चा चक्क प्रादेशिक मधील शितूरपैकी तळीचा वाडा इथे बळवल्याने नागरिकानां घरात बाहेर पडणे मुश्कील झालेचे चित्र आहे शाळेतील मुलामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या वाड्यावर एसटी बसची सोय नसल्याने दररोज पायपीट करत विद्यार्थ्यांना किमान ५ ते ६ किमी अंतर पायवाटेने डोंगारातुन यावे लागते. सकाळी तळीच्या वाड्यावर चंदा आल्याचे समजताच वाड्या-वस्तीवरील विद्यार्थ्यांनी सुट्टी घेत घरी राहणे पसंद केले आहे
चंदा वाघिणी ही सात ते आठदिवसांपूर्वी उदगिरीच्या पठारावर दिसून आली होती. अनेक पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना दिसून आलेने वाघीण याठिकाणी आहे हे स्पष्ट झाले. पुन्हा ती अंबाईवाडा याठिकाणी दिसून आली. याठिकाणी एका शेतकयाचे रेडकू गायब झाल्याने त्याला शोधाशोध करण्यासाठी बन विभागाने त्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला. जनावरे सोडण्यात येऊ नये, असे सांगण्यात आले. सर्व नागरिक तणावात असतानाच तिने आपला मोर्चा तळीचा वाडा या परिसरात वळविला आहे
मागील वर्षी केदारलिंग बाडी याठिकाणी एका लहान मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिला ठार केले होते. ही गंभीर घटना त्या परिसरात घडलेली असतानाच आज त्याठिकाणी वाघीण दिसून आल्याने पूर्ण परिसरात घबराट आहे. केदारलिंग बाडी, राघूचा वाडा, तळीचा बाडा आणि ढवळेवाडी या छोट्या वस्त्या पूर्णपणे जंगलांनी वेढलेल्या असल्याने या सर्व परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले