अमेरिका - कॅनडा लढतीने आज विश्वचषकाची सुरुवात
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टुअर्ट लॉ याने प्रशिक्षित केलेला स्पर्धेचे सह-यजमान अमेरिकेचा संघ भारतीय वेळेनुसार आज रविवारी सकाळी कॅनडाविऊद्धच्या सामन्याने टी-20 विश्वचषकाची सुऊवात करेल. स्पर्धेच्या तयारीच्या अंतर्गत पूर्ण सदस्य असलेल्या बांगलादेशला 2-1 ने पराभूत करून अमेरिकेने हे सिद्ध केले आहे की, तो कमकुवत संघ नाही. नुकतेच कॅनडाला 4-0 ने त्यांनी पराभूत केलेले असल्याने त्यांचे पारडे जड राहील.
न्यूझीलंडचा माजी खेळाडू कोरे अँडरसन याच्या समावेशाने संघाला मोठी चालना मिळेल. यजमानांचे नेतृत्व यष्टिरक्षक-फलंदाज मोनांक पटेल करणार आहे. या संघात मुंबई आणि राजस्थान रॉयल्सचा माजी डावखुरा फिरकीपटू हरमीत सिंग तसेच दिल्ली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा माजी फलंदाज मिलिंद कुमार ही काही ओळखीची नावे देखील आहेत. याशिवाय सौरभ नेत्रावळकर, आरोन जोन्स आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केलेला त्यांचा सलामीवीर स्टीव्हन टेलर हे संघात आहेत.
अली खान देखील दुखापतीतून सावरून स्पर्धेसाठी तंदुऊस्त झाला आहे, कॅनडाकडून 18 टी-20 सामने खेळलेला अष्टपैलू नितीश कुमार यावेळी अमेरिकेच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. दुसरीकडे, कॅनडाचा भर डावखुरा फिरकीपटू साद बिन जफर, सलामवीर आरोन जॉन्सन आणि डावखुरा वेगवान गोलंदाज कलीम सना यांच्यवर राहील. या संघातील अवघे चार खेळाडू 30 वर्षांखालील आहेत.
सामन्याची वेळ : सकाळी 6 वा. (भारतीय वेळेनुसार)