विश्व तिरंदाजी स्पर्धा आजपासून
दीपिका कुमारी, ज्योती सुरेखा वेन्नम करणार भारतीय पथकाचे नेतृत्व
वृत्तसंस्था/ ग्वांगजू डकोरिया
आज शनिवारपासून येथे सुरू होणाऱ्या जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये ऑलिंपियन दीपिका कुमारी आणि कंपाउंड स्टार ज्योती सुरेखा वेन्नम यांच्यासह 12 भारतीय खेळाडू सहभागी होतील. 1931 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेली जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धा 1950 पासून द्वैवार्षिक स्पर्धा बनलेली आहे.
भारतीय तिरंदाजांनी या स्पर्धेत 15 पदके जिंकली आहेत. त्यात तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि तीन कांस्यपदकांचा समावेश आहे. सर्व तीन सुवर्णपदके आणि एक कांस्यपदक 2023 मध्ये बर्लिनमध्ये आयोजित केलेल्या मागील आवृत्तीत जिंकले होते, जिथे भारताने पहिले स्थान पटकावले होते. त्यावेळी आदिती स्वामी ही सर्वांत तऊण महिला कंपाउंड विश्वविजेती ठरली होती, तर भारताचा ओजस देवताळे हा 2023 च्या आवृत्तीत पुऊष कंपाउंड विजेता ठरला होता.
बर्लिनमध्ये वैयक्तिक कांस्यपदकावर समाधान मानणाऱ्या ज्योती सुरेखा वेन्नमने अदिती आणि प्रणीत कौर यांच्यासोबत महिला कंपाउंड संघातर्फे सुवर्णपदक जिंकले होते. ज्योती आणि प्रणीत या दोघीही या वर्षीच्या संघाचा भाग आहेत, परंतु विद्यमान विजेती अदिती आणि ओजस आपापल्या मुकुटांचे रक्षण करणार नाहीत. विनिपेग येथे नुकत्याच संपलेल्या जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या 18 वर्षांखालील विभागात रौप्यपदक जिंकणारी प्रीतिका प्रदीपही यावर्षी महिला कंपाउंड संघाचा भाग आहे.
दरम्यान, 2011 आणि 2015 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन वेळा सांघिक रौप्यपदक मिळविणारी दीपिका कुमारी रिकर्व्ह संघाचे नेतृत्व करेल, ज्यामध्ये तिचे सहकारी ऑलिंपियन धीरज बोम्मदेवरा आणि अंकिता भकत यांचाही समावेश आहे. विनिपेगमध्ये 18 वर्षांखालील रिकर्व्ह संघातून दोन सांघिक कांस्यपदके जिंकणारी तऊण गाथा आनंदराव खडके देखील या संघात आहे.
74 देश आणि प्रदेशांतील 500 तिरंदाज ग्वांगजू येथे जागतिक विजेतेपदासाठी स्पर्धा करतील. ही तिरंदाजी स्पर्धा 11 सप्टेंबर रोजी संपेल. या वर्षीच्या स्पर्धेत पुऊष आणि महिला सांघिक, मिश्र सांघिक आणि वैयक्तिक स्वरूपातील स्पर्धा समाविष्ट आहेत. जागतिक तिरंदाजी स्पर्धेतील भारतीय संघ-रिकर्व्ह पुऊष: धीरज बोम्मदेवरा, नीरज चौहान, राहुल. रिकर्व्ह महिला : अंकिता भकत, गाथा आनंदराव खडके, दीपिका कुमारी. कंपाउंड पुऊष : प्रथमेश भालचंद्र फुगे, अमन सैनी, ऋषभ यादव, कंपाउंड महिला : प्रणीत कौर, प्रीतिका प्रदीप, ज्योती सुरेखा वेन्नम.