महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्पतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा उत्साहात

11:09 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जांबोटी येथे कणकुंबी, बैलूर-जांबोटी केंद्रातील प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांचा सहभाग

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतो, तो लोकशाहीचा निर्माता आहे. शिक्षक भावी पिढीचे मार्गदर्शक आहेत. शिक्षकांना  शासकीय कामे सक्तीने सोपवली जातात. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा खालावत आहे, असे मत लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष, तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. जांबोटी येथील बाबुराव ठाकुर महाविद्यालयात एकदिवसीय शैक्षणिक कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाऊंडेशनवतीने जांबोटी, कणकुंबी आणि बैलूर केंद्रातील  शिक्षकांसाठी शनिवारी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते.  उद्घाटन समारंभाला खानापूरच्या  गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची, जांबोटी ग्रा.पं. अध्यक्षा लक्ष्मी तळवार, लोककल्पचे चेअरमन अजित गरगट्टी, लोकमान्यचे संचालक पंढरी परब आदींच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले.

डॉ. किरण ठाकुर म्हणाले, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत खेड्यापाड्यात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवणाऱ्या शिक्षकांना आजही मानसन्मान आहे. ग्रामीण भागात अजूनही संस्कृती टिकून आहे.आजकाल शाळा चालवणं, शाळा काढणं सोपं झालं आहे. शिक्षक स्वाभिमानी असला पाहिजे, नोकरी करताना कुठेही बदली झाली तरी काम करण्याची तयारी ठेवली पाहिजे,  शैक्षणिक बाबतीत जांबोटी, कणकुंबी भाग मॉडेल ठरला पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करूया. लोकमान्य सोसायटी व लोककल्प फाऊंंडेशनने या भागातील 32 गावे दत्तक येथील शाळांना विविध शैक्षणिक साहित्य पुरवले आहे. सर्व शाळांच्या विकासासाठी शैक्षणिक मदत करण्यास आम्ही तत्पर आहोत. शिक्षकांनी शाळेच्या विकासासाठी स्वयंसेवकाप्रमाणे काम हाती घेतले शाळा स्वयंपूर्ण व्हायला वेळ लागणार नाही, असे सांगितले.

प्रारंभी बाबुराव ठाकुर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी स्वागतगीत म्हटले. लोककल्पचे सूरज सिंग राजपूत यांनी प्रास्ताविकात शैक्षणिक कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश सांगितला. रसिका गुरव हिने लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाऊंडेशनच्या कार्याची माहिती दिली. यावेळी लोककल्पच्या सीएसआर मॅनेजर मालिनी बाली यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. याप्रसंगी लोककल्पचे चेअरमन अजित गरगट्टी, लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब, डॉ. दामोदर वागळे, किरण गावडे, शैक्षणिक संयोजक डॉ. डी. एन. मिसाळे, निवृत्त कर्नल दीपक गुरुंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कणकुंबी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. जी. चिगुळकर यांनी लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाऊंडेशनच्या माध्यमातून जांबोटी, कणकुंबी भागातील शैक्षणिक कार्याची माहिती दिली. लोकमान्यचे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे ट्रेनर पराग गांधी यांनी शिक्षकांसमोरील असलेली आव्हाने व शैक्षणिक कौशल्यावर आधारित अनेक उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन लोकमान्यचे अधिकारी राजू नाईक यांनी केले. सदर शैक्षणिक कार्यशाळेला जांबोटी, कणकुंबी आणि बैलूर केंद्रातील सुमारे शंभर शिक्षक उपस्थित होते. उपस्थित सर्व शिक्षकांना लोकमान्य सोसायटी आणि लोककल्प फाऊंडेशनचे प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देण्यात आली. शैक्षणिक शिबिर यशस्वी करण्यासाठी लोककल्प फाऊंडेशनच्या सीएसआर मॅनेजर मालिनी बाली, सूरजसिंग राजपूत, गुरुप्रसाद तंगणकर, संतोष कदम, प्रितेश पोतेकर, किशोर नाईक, अनंत गावडे, निशांत जाधव, ओंकार कुलकर्णी, स्वप्नाली कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

मराठी माध्यम शाळांची गुणवत्ता सरस

खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी राजश्री कुडची म्हणाल्या की, खानापूर तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण आहे. दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. तालुक्यात 402 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये 394 अतिथी शिक्षक म्हणून काम करत आहेत. एकंदरीत विचार केला तर काही बाबतीत मराठी माध्यमाच्या शाळांची गुणवत्ता अधिक चांगली आहे. शैक्षणिक बाबतीत खानापूर तालुक्यातील मराठी माध्यमाची शैक्षणिक प्रगती समाधानकारक आहे, असे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article