महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भुयारात अडकलेल्या कामगारांनी मागितली खैनी, गुटखा अन् विडी

06:45 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उत्तराखंडमधील अजब प्रकार : वायुदलासोबत नॉर्वे अन् थायलंडच्या पथकाकडून बचावकार्य

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

Advertisement

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सिलक्यारा भुयारात 40 कामगार अडकून पडले आहेत. मागील 78 तासांपासून सिलक्यारा भुयारातून 40 जणांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य केले जात आहे. या कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शोध अन् बचावकार्यात अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होत आहेत. प्रथम कॅविटीयुक्त क्षेत्रातून सातत्याने कोसळणाऱ्या ढिगाऱ्यामुळे बचावकार्यात अडचणी आल्या आणि मग यंत्र नादुरुस्त झाले होते. अशा स्थितीत कामगारांशी संपर्क साधण्यात आल्यावर त्यांनी खैनी, गुटखा अन् विडीची मागणी केल्याचे आणि त्यांना ही सामग्री पुरविण्यात आल्याचे समोर आले आहे.

तर दुसरीकडे दिल्लीतून एअरलिफ्ट करत आणल्या गेलेल्या नव्या यंत्रासाठी भुयारात प्लॅटफॉर्म तयार केला जात आहे. मंगळवारी तयार करण्यात आलेले प्लॅटफॉर्म आणि खराब झालेले ऑगर ड्रिलिंग यंत्र हटविण्यात आले आहे. सिलक्यारा भुयारात शनिवारी संध्याकाळी रात्रीच्या शिफ्टदरम्यान गेलेले कामगार भूस्खलनामुळे अडकून पडले आहेत. या कामगारांसाठी पाणी बाहेर सोडणाऱ्या पाइपद्वारे खाद्यसामग्री, ड्रायफूट आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मंगळवारी औषधेही पाठविण्यात आली होती. परंतु कामगारांनी खैनी, गुटख्याची मागणी केली. बचावकार्यात सामील पथकाने ही सामग्री पाइपद्वारे पोहोचविली आहे.

वायुदलाच्या तीन विशेष विमानांनी 25 टन वजनाची यंत्रसामग्री आणली असून ती ढिगाऱ्याला भेदून स्टील पाइप दुसऱ्या बाजूला पोहोचविण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. यंत्रसामग्रीद्वारे प्रतिदास 5 मीटर ढिगारा दूर करता येणार आहे. आता या बचावकार्यात नॉर्वे आणि थायलंडच्या विशेष पथकांची मदत घेण्यात येत आहे.

सिलक्यारा भुयारायच डीपीआरवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. भुयार निर्मितीच्या क्षेत्रात खडकांच्या क्षमतेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या दोन कंपन्यांनीच हे प्रश्न उपस्थित केले आहेत. एका कंपनीने रितसर स्वत:च्या वेबसाइटवर डीपीआरमधील त्रुटींचा उल्लेख केला आहे.

भुयारात अडकून पडलेल्या 40 कामगारांचे कुटुंबीय चिंताग्रस्त आहेत. स्वकीयांशी संपर्क साधता न आल्याने त्यांनी दुर्घटनास्थळानजीकच निदर्शने सुरू केली आहेत. एकीकडे बचावकार्य सुरू आहे, तर दुसरीकडे निदर्शनेही सुरू झाली आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article