For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

MIraj News : सह्याद्री स्टार्च कंपनीत काम करत असताना कामगाराचा भाजून मृत्यू

02:41 PM Nov 23, 2025 IST | NEETA POTDAR
miraj news   सह्याद्री स्टार्च कंपनीत काम करत असताना कामगाराचा भाजून मृत्यू
Advertisement

                    मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च कारखान्यात कामगाराचा मृत्यू

Advertisement

कुपवाड : मिरज औद्योगिक वसाहतीमधील सह्याद्री स्टार्च कारखान्यात बर्गेस मशिनवर काम करीत असताना अचानक खाली पडल्याने मशीनमध्ये गंभीररित्या भाजून जखमी झालेल्या एका कामगाराचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक दुर्घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

यामध्ये गजानन शिवपाद बाडगे (वय ५२, रा. शिवशक्तीनगर, कुपवाड) असे मयत झालेल्या कामगाराचे नाव आहे. गुरुवारी २० रोजी दुपारी ही घटना घडली. यात गंभीर जखमी झाल्याने कारखाना व्यवस्थापनाने जखमीला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे कामगाराचा मृत्यू झाला.

Advertisement

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृत कामगाराच्या नातेवाईकानी शासकीय रुग्णालयात गर्दी करून प्रचंड आक्रोश केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत कामगार गजानन बाडगे हे अनेक महिन्यांपासून मिरज एमआयडीसीतील सह्याद्री स्टार्च कारखान्यात कामाला होते. ते गुरुवारी २० रोजी नेहमीप्रमाणे कारखान्यात काम करीत होते. बगैस मशिनवर काम करीत अ-सताना दुपारी अचानक खाली पडल्याने मशीनमध्ये गंभीररित्या भाजून जखमी झाले.

यावेळी घटनास् थळी उपस्थित कामगारांनी त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. प्रचंड आरडाओरडा केला. माहिती मिळताच कंपनी व्यवस्थापनाने धाव घेऊन जखमी अवस्थेत ग-जानन बाडगे यांना त्यांचा भाचा विजय बबन बडेर याच्या मदतीने उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला.

मयताच्या नातेवाईकांनी शनिवारी सकाळी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी केली. मयताला जब् शाबदार असण्प्रया कंपनी व्यवस्थापन विरोधात कारवाई करावी, मयताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा, नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी आक्रोश केला. याची दखल घेऊन कंपनी व्यवस्थापनाने मयत कामगाराच्या वारसांना बायावर सोडणार नाही. योग्य न्याय देऊन रीतसर मदतीची ग्वाही दिली. घटनेची कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास कुपवाड पोलिस करीत आहेत.

Advertisement
Tags :

.