महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शाहू छत्रपतींच्या विजयासाठी ताकदीने कामाला लागा; आमदार सतेज पाटील यांचे माजी नगरसेवकांना आवाहन 

02:50 PM Apr 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

लोकसभेच्या निवडणूकीच्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी करण्यासाठी ताकदेने कामाला लागा, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवकांना केले. न्यू पॅलेस येथील माजी नगरसेवकांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते.

Advertisement

आमदार पाटील म्हणाले, कोल्हापूर हे पुरोगामी विचारांचे असून हे देशाला दाखवून देण्यासाठी शाहू छत्रपतींना संसदेमध्ये पाठविण्याचा मानस आहे. महाविकास आघाडीचे सर्वजण यासाठी दिवसरात्र एक करत आहे. यामध्ये 228 माजी नगरसेवक एक दिलाने शाहू छत्रपतीच्या पाठीशी असून त्यांना निवडून आणल्या शिवाय स्वस्त बसणार नाहीत.

Advertisement

नगरसेवकांचा थेट नागरीकांशी संपर्क असतो. महाविकास आघाडीचे हे नगरसेवक शहरातून मताधिक्य देतील. लोकसभेची निवडणूक खिलाडूवृत्तीने व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू असताना विरोधकांकडून मात्र, चुकीच्या पद्धतीने प्रचार सुरू आहे. त्यांच्या वृत्तीला जनता चोख उत्तर देईल, असा इशारा सतेज पाटील यांनी दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वांच्या जवळचे असणारे आहेत. त्यामुळे माजी नगरसेवकांवर पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी महापौर अॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, केंद्रातील भाजप सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. इलेक्ट्रॉन बाँडमध्ये महाघोटाळा झाला आहे. एकीकडे जनतेचे महागाईने कंबरडे मोडले असून उद्योजकांच्या संपत्तीत वाढ होत चालली आहे. जाती, धर्मात भांडणे लावली जात आहेत. अशावेळी देश वाचवण्यासाठी सर्वांनी सिध्द झाले पाहिजे. देशातील हुकुमशाही कारभार परतावून लावण्याची लढाई कोल्हापूरातून झाली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.

शाहू छत्रपती सर्वसामान्यांच्यात मिसळत असतात. लोकांची ग्राहणी ऐकून घेतात. पण विरोधकांनी दत्तक प्रकरणावरुन अकलेचे तारे तोडले आहेत. भारतीय घटनेने दत्तक विधान कायद्याने एकादी व्यक्ती दत्तक आली तर मूळ घरांशी संबध संपूण जाते, ज्या घरात दत्तक येतात त्यांचे संबध सुरू होतात. याकडे अॅड. अडगुळे त्यांनी लक्ष वेधले. व्ही.बी.पाटील म्हणाले, कोल्हापुरात कोणतेही संकट आले त्यावेळी शाहू छत्रपती धाऊन आले आहेत. त्यांची उमेदवारी ही जनतेच्या रेट्याखाली झाली असून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

अजित पोवार गटाचेही नगरसेवकांचाही पाठींबा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नगरसेवकही महाविकास आघाडीच्या बैठकीला हजर होते. यामध्ये राजेश लाटकर, रमेश पोवार, सचिन पाटील, विनायक फाळके, अनिल कदम यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्वजण प्रचाराच्या नियोजनात आहेत. शाहू प्रेमी असल्याने महायुतीचा प्रचार करणार असल्याची त्यांची भूमिका आहे. तसेच राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शमा मुल्ला ही बैठकीला हजर होत्या.

माजी नगरसेवक अनेक वर्षाने एकत्र
नगरपालिकेपासून आतापर्यंत 50 वर्षातील महापालिकेत प्रतिनिधीत्व करणारे 228 माजी नगरसेवक न्यू पॅलेस येथील बैठकीला उपस्थित होते. यामध्ये काहींची अनेक वर्षानी भेट झाली. रात्री उशीरापर्यंत न्यू पॅलेसवर त्यांच्या गप्पा रंगल्या होत्या.

 

Advertisement
Tags :
MLA Satej PatilShahu Chhatrapati
Next Article