For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जनतेसाठी जबाबदारीने काम करा !

11:19 AM May 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
जनतेसाठी जबाबदारीने काम करा
Advertisement

अर्चना घारे परब ; पाडलोस ग्रामस्थांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
वाढती महागाई, पेट्रोल दर, बेरोजगारी,आरोग्याची वाढती समस्या सोडविण्यास भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अशा या सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. पक्षप्रवेशकर्त्यांनी जोमाने व जबाबदारीने काम करावे आम्ही तुमच्यासोबत कायम राहणार अशी ग्वाही, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)च्या कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी दिली.

पाडलोस गावातील ग्रामस्थांनी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले तसेच कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. व्यासपीठावर सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, सोशल मिडीया फ्रंट जिल्हाध्यक्ष  संजय भाईप, युवती जिल्हाध्यक्षा सावली पाटकर, सावंतवाडी तालुका मतदारसंघ युवती अध्यक्षा सुनिता भाईप, सावंतवाडी तालुका मतदार संघ महिला तालुकाध्यक्षा नितेशा नाईक, सावंतवाडी तालुका मंतदारसंघ युवक तालुका अध्यक्ष विवेक गवस, सोशल मीडीया फ्रंट सावंतवाडी तालुका अध्यक्ष प्रसाद परब, विद्यार्थी संघटना अध्यक्ष ॠतिक परब, वैभव परब, अजित नातू आदी मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

यावेळी मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघ युवक अध्यक्षपदी अमोल नाईक, महिला अध्यक्ष रेश्मा कोरगावकर, विद्यार्थी सेना युवा अध्यक्ष अक्षय साळगावकर, पाडलोस बूथ अध्यक्षपदी गणपत पराडकर, उपाध्यक्षपदी बाबू कुबल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामस्थ आनंद कुबल, गोविंद पराडकर, रविंद्र कोरगावकर, एकनाथ नाईक, सप्रेम परब, रामा गावडे, कार्तिक पराडकर, गोकुळदास परब यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी व महिलांनी पक्षप्रवेश केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल नाईक यांनी केले. प्रास्ताविकमध्ये गणपत पराडकर यांनी गावातील समस्यांचा पाढाच वाचला. आभार संजय भाई यांनी मानले.

Advertisement
Tags :

.