जिल्ह्यातील 8, 841 शेतकऱ्यांना ‘मोफत वीज'; मुख्यमंत्री बळीराजा योजना जाहीर
7.5 एाापीपर्यंत कृषीपंप धारक शेतकऱ्यांना मिळणार लाभ
रत्नागिरी पतिनिधी
शेतकऱ्यांना शासनाच्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 चा मोठा आधार मिळणार असून त्याबाबता शासन आदेश झाला आहे. या योजनेतून 7.5 एचपी पर्यंतच्या शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज मिळणार आहे. जिह्यातील 8 हजार 841 कृषी पंप ग्राहकांना या योजनेचा फायदा होणार आहे.
राज्यातील शेतकरी अडचणीत आल्याने त्यांयासाठी राज्य शासनाकडून शेतकऱयांना मदतीचा हात देण्यात आला आहे. शासनाने 7.5 एची.पी.पर्यंतच्या कृषीपंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे जाहीर केले आहे. एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे. योजनेचा कालावधी पा वर्षां आहे. एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत ही योजना राबवण्यात मान्यता देण्यात आली आहे. मात्र 3 वर्षांच्या कालावधीनंतर या योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिह्यात कृषी पंपधारक 8 हजारर 841 शेतकरी आहेत. त्यांची थकबाकी 3 कोटी 31 लाख एवढी आहे. शासनाच्या बळीराजा मोफत वीज योजनेचा या शेतकऱयांना फायदा होणार आहे. एप्रिल 2024 पासून 7.5 एच.पी पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे. शासनास विद्युत अधिनियम 2003, कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. वीज दर सवलतीपोटीची रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रीम स्वरुपात वर्ग करण्यात येणार आहे.