कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

निलजी-मुतगे गावच्या शेतवडीतून सांबरा रेल्वे स्टेशनपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काम रखडले

11:19 AM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर/सांबरा

Advertisement

निलजी गावच्या मुख्य रस्त्यापासून निलजी व मुतगे या दोन्ही गावच्या शेतवडीतून सांबरा रेल्वे स्टेशनपर्यंत जाणारा शेतरस्ता काही शेतकऱ्यांच्या हरकतीमुळे रखडला आहे.सुमारे चार वर्षांपूर्वी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मजबूत व शाश्वत रस्ता करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलले होते. याबाबतचे आरेखनही करण्यात आले होते. मात्र काही शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी आक्षेप घेऊन काम थांबवले. त्यामुळे तब्बल चार वर्षे झाली हे काम रखडले आहे. याबरोबरच रस्त्याशेजारी विद्युत खांबही बसविणार होते. शेतकऱ्यांना  शेतात जाण्या येण्यासाठी शेतरस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते (पायवाटा) अत्यंत महत्त्वाचे आहेत.

Advertisement

आजच्या यांत्रिकीकरणांमध्ये शेतीमध्ये विविध कामे जसे कि, पेरणी, नांगरणी, आंतरमशागत, कापणी, मळणीसह इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येत आहेत. शेतीमाल विक्रीसाठी बाजारात पोहचविण्याकरीता तसेच विविध यंत्रसामग्री शेतीकामासाठी शेतीपर्यंत पोहचण्यासाठी शेतीला सर्वऋतूत व बारमाही शेत रस्त्यांची अत्यंत आवश्यकता असते. यामुळे शेतरस्ते, शिवरस्ते, पाणंद रस्ते व पाऊल रस्ते इत्यादी रस्ते प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता उपयोगात येत असतात. हे ओळखून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी एक चांगले पाऊल उचलले होते. हे सर्व रस्ते शेतमाल आणि यंत्रसामग्रीची वाहतूक करण्याकरीता पावसाळ्यामध्ये रस्ते सुयोग्य आणि व्यवस्थित असणे आवश्यक आणि गरजेचे आहे.

अतिक्रमणामुळे रस्ता अरूंद

शेतकऱ्यांची गरज ओळखून रस्त्यांची गुणवत्ता खराब न करता मजबूत रस्ता करण्याच्या दृष्टीने आमदारांनी पाऊल उचलले होते. काही ठिकाणी शेत रस्त्याच्या शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. शेतातील रस्ता झाल्यास शेतकऱ्यांच्या प्रगतीस हातभार लागणार आहे. शेत रस्ते हेसुद्धा अन्य महामार्ग एवढेच महत्त्वाचे आहेत. रस्त्याअभावी शेतकऱ्यांना आधुनिक शेती करणे शक्य होत नाही. हे ओळखून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर या शेतवडीतील रस्ता करण्यासाठी कार्यरत आहेत. पुढील वर्षात निलजी गावची लक्ष्मी यात्रा भरवण्याच्या दृष्टीने गावकऱ्यांनी तयारी दर्शवली आहे. अशा स्थितीत हा रस्ता होणे अत्यंत गरजेचे आहे.

...तर पर्यायी रस्ता सुचवू!

जर या रस्त्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला तर अलौकिक ध्यानमंदिरपासून निलजी ब्रह्मलिंग तलाव शेजारून ब्रह्मलिंग गल्लीतून स्मशानमार्गे सांबरा रेल्वे स्टेशनपर्यंत हा रस्ता करण्याचा प्रस्ताव काही शेतकऱ्यांनी बोलून दाखविला आहे. तरी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याकामी जातीने लक्ष घालून रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी शेतकरी बांधवांची मागणी आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article