Solapur : कोंडी–राष्ट्रीय महामार्ग सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाला सुरुवात !
कोंडी येथे विकासकामांचा शुभारंभ
उत्तर सोलापूर : कोंडी येथे विविध विकासकामांना सुरुवात करण्यात आली. रविवारी सकाळी आ. देशमुख यांच्या हस्ते कोंडी गाव ते राष्ट्रीय महामार्गासाठी एक कोटी रुपये खर्चुन तयार होणाऱ्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी देशमुख यांनी कोंडी गावाच्या विकास कामाला आणखीन निधी उपलब्ध करू, अशी ग्वाही दिली.
कोंडी गावाला राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याला आ. देशमुख यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे. आता हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा होणार आहे.
कोडी यावेळी उपसरपंच शिवाजी नीळ, शिवसेना नेते भरत पाटील, माजी उपसरपंच किसन भोसले, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर मोरे,राजेंद्र भोसले, कैलास भोसले, बाळासाहेब मोरे, दिलीप राऊत, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश भोसले, महेश मोरे, काका शिंदे उपस्थित होते. यावेळी देशमुख यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचेही उद्घाटन करण्यात आले.