Solapur News : सांगोला तालुक्यात अज्ञात कारणावरून वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
06:06 PM Dec 10, 2025 IST | NEETA POTDAR
Advertisement
आगलावेवाडीत वृद्धाचे आत्महत्येने निधन
Advertisement
सांगोला : अज्ञात कारणावरून ६५ वर्षीय वृध्दाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आगलावेवाडी (ता. सांगोला) येथे घडली. साऊबा विठोबा माळी असे गळफास घेतलेल्या वृद्धाचे नाव आहे.
साऊबा विठोबा माळी यांनी मंगळवारी साय. पाच वाजण्याच्या सुमारास शेतातील जांभळीच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला होता. त्यांना उपचाराकरिता सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना तपासून ते उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगितले. याबाबत अनिल साऊबा माळी याने खबर दिली आहे. पो. ना. प्रमोद गवळी तपास करीत आहेत.
Advertisement
Advertisement