महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलगा-मच्छे बायपासचे काम रोखले

11:32 AM Nov 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माधवपूर शिवाराच्या ठिकाणचे काम शेतकऱ्यांनी हाणून पाडले : संताप अनावर; कामगारांनी घेतला काढतापाय

Advertisement

बेळगाव : शेतकऱ्यांचा जोरदार विरोध असतानाही हलगा-मच्छे बायपासच्या कामाला सोमवार दि. 11 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. मात्र गुरुवारी माधवपूर शिवाराच्या ठिकाणचे काम शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत हाणून पाडले. ज्या शेतजमिनीवर कुटुंब चालले, ती बायपाससाठी जात असल्याचे पाहून शेतकऱ्यांना संताप अनावर झाला. कंत्राटदाराने या कामासाठी आणलेली यंत्रसामग्री पाहताच शेतकरी आक्रमक होऊन त्यांनी कंत्राटदाराच्या माणसांना पिटाळून लावले. शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन बायपासचे काम करणाऱ्या कामगारांनी तेथून पळ काढला. हे काम सुरू असताना पोलीसही सुरक्षेसाठी हजर होते. पोलिसांनी शेतकऱ्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता आमच्या जमिनी चालल्या आहेत, तुम्हाला आमचे दु:ख कसे समजणार? असे म्हणत शेतकऱ्यांनी पोलिसांनाही दाद न देता आक्रमक होऊन काम करणाऱ्या लोकांना अक्षरश: पिटाळून लावले.

Advertisement

शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा

हलगा-मच्छे बायपास शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. शेतजमीन गेली तर पुढे काय खायचे? याची धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे. बायपासच्या निषेधार्थ एका युवा शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तर एका शेतकऱ्याला स्मृतीभ्रंश झाला आहे. जमीन जाण्याचे दु:ख शेतकऱ्यांना जीवनातून उठवत आहे. त्यामुळे सरकारने प्रथम शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, असे राजू मरवे यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article