For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बैलूर-हब्बनहट्टी क्रॉस रस्त्याचे काम रखडले

10:24 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
बैलूर हब्बनहट्टी क्रॉस रस्त्याचे काम रखडले
Advertisement

रस्त्याअभावी वाहनधारक-नागरिकांचे हाल : रस्ताकाम त्वरित सुरू करण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर /जांबोटी

बैलूर-हब्बनहट्टी क्रॉसपर्यंतच्या दीड कि. मी. रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षापासून रखडल्यामुळे रस्त्याअभावी बैलूर परिसरातील नागरिकांचे हाल होत असून या रस्त्याच्या कामाला त्वरित प्रारंभ करावा, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या रस्त्याचा समावेश बैलूर, तोराळी, गोल्याळी संपर्क रस्त्याअंतर्गत होतो. सुमारे 15 वर्षापूर्वी नाबार्ड योजनेतून सदर स्त्याची निर्मिती करण्यात आली होती. मात्र रस्त्याच्या देखभालीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्यामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय बनली होती. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांनी उचलून धरल्यामुळे दोन वर्षापूर्वी बैलूर गावापासूनच्या दोन कि. मी. अंतराच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. तसेच या रस्त्यापैकी हब्बनहट्टी क्रॉस ते गोल्याळीपर्यंतच्या रस्त्याची देखील गेल्या दोन महिन्यापूर्वी दुरुस्ती करण्यात आल्यामुळे सदर रस्ता सुस्थितीमध्ये आहे. मात्र या रस्त्याअंतर्गत येणाऱ्या बैलूर गावापासून ते हब्बनहट्टी क्रॉसपर्यंतच्या साधारण दीड कि. मी. रस्त्याच्या दुरुस्तीकडे गेल्या दोन वर्षापासून साफ दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे या रस्त्याची अवस्था फार दयनिय झाली असून हा रस्ता सद्यस्थितीमध्ये वाहतुकीला अयोग्य बनल्यामुळे खराब रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Advertisement

दुरुस्तीच्या नावाखाली रस्ता उखडला

गेल्या दोन वर्षापूर्वी बैलूर गावापासून दीड कि. मी. रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र दुरुस्तीच्या नावाखाली दोन वर्षापूर्वी जेसीबी मशीनच्या सहाय्याने हा संपूर्ण रस्ता उखडण्यात आला आहे. तेंव्हापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाले असून दसर रस्त्याचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ख•dयांचे तसेच धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे या रस्त्यावरुन वाहने चालविताना वाहनधारकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. वास्तविक दोन महिन्यापूर्वी गोल्याळीपर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. त्यावेळीच बैलूर ते हब्बनहट्टी क्रॉसपर्यंतच्या अर्धवट अवस्थेतील रस्त्याचीही दुरस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे रस्त्याच्या भवितव्यासंदर्भात सांशकता व्यक्त होत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून बैलूर, हब्बनहट्टी क्रॉसपर्यंतच्या रस्त्याची पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.