Sangli News : नेर्लीतील अपशिंगे फाटा-शिंदेमळा रस्त्याचे काम पूर्ण
नेर्लीतील दीड किलोमीटर रस्त्याचे काम लोकवर्गणीतून व श्रमदानातून
कडेगाव : नेर्ली (ता. कडेगाव) येथील अपशिंगे फाटा ते शिंदे मळा रस्ता खूप खराब झाला होता. रस्ता करण्याची परिसरातील नागरिक मागणी करत होते. नुकताच नेर्ली गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान मध्ये भाग घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून अपशिंगे फाटा ते शिंदेमळा दीड किलोमीटर रस्ता मुरुमीकरण लोकवर्गणीतून आणि श्रमदानातून करण्याचा करण्याचा निर्णय ग्रामपंचायत मासिक मिटिंगमध्ये घेण्यात आला.
ठरल्याप्रमाणे परिसरातील नागरिकांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या श्रमदानातून आणि लोकवर्गणीतून रस्ता पूर्ण करण्यात आला. श्रमदानामध्ये सरपंच राजाराम शिंदे सरकार, उपसरपंच संजय मोहिते, सदस्य शंकर मुळीक, अभिजित वलेकर, मा. उपसरपंच व सदस्य प्रकाश कांबळे, मा. उपसरपंच व सदस्या मुमताज मुजावर, सदस्या संजीवनी पवार, मदिना आगा, सुनंदा लोंढे, गंगुबाई गायकवाड, ग्रामसेवक अभिजित घबक, ग्रामपंचायत कर्मचारी पोपट लोंढे,
शिवाजी गायकवाड, प्रशांत क्षीरसागर, निखिल क्षीरसागर, राणी पाटील, ग्रामस्थ आनंदा लोंढे, शिवाजी, शिंदे, प्रकाश, शिंदे, चंद्रकांत शिंदे, पांडुरंग शिंदे, प्रदीप शिंदे, संभाजी शिंदे, राजाराम जंगम, सुनील जंगम, गणेश पवार, संतोष पवार, महादेव शिंदे, बाळुताई पवार, वैशाली शिंदे, संगीता शिंदे, विमल शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदवला. या कामी कडेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत, विस्तार अधिकारी सुनील लोहार यांनी मार्गदर्शन केले.