कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बुलेट ट्रेनच्या 300 किमी मार्गाचे काम पूर्ण

06:45 AM May 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती : मुंबईत स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी नवी माहिती दिली आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीडर रेल्वे प्रकल्पाचे मोठे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात 300 किलोमीटर वायडक्टचे काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून साकारला जात आहे. 300 किलोमीटरचा वायडक्ट पूर्ण झाल्याचा अर्थ बुलेट ट्रेनच्या मार्गाचा 300 किलोमीटरचा हिस्सा आता स्तंभांवर निर्माण करण्यात आला आहे. वायडक्टचा अर्थ पूलासारखी संरचना ज्यावरून रेल्वे धावणार आहे.

मुंबई बुलेट ट्रेन स्टेशन बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्समध्ये निर्माण केले जात आहे. हे स्टेशन जमिनीच्या खाली असणार आहे. येथे 76 टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे. 14.2 लाख क्यूबिक मीटर खोदकाम झाले असून एकूण 18.7 लाख क्यूबिक मीटर माती तेथून काढली जाणार आहे.

साइटवर तीन बॅचिंग प्लँट स्थापन करण्यात आले आहेत. बॅचिंग प्लँटमध्ये आइस प्लँट आणि चिलर प्लँट देखील असून ते काँक्रिटचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करतात. उन्हाळ्यात काँक्रिट लवकर सुकत असल्याने त्याला थंड ठेवणे आवश्यक असते. साइटवर आधुनिक कँक्रिट लॅबल देखील येथून पाण्याची पारगम्यता आणि रॅपिड क्लोराइड पेनिट्रेशन टेस्टसारखी सुविधा देखील आहे. या टेस्टद्वारे काँक्रिटच्या गुणवत्तेचा शोध लागतो. सर्व काँक्रिट टेस्ट साइटवरच होतात, काही नमुने लॅबमध्ये देखील पाठविले जात आहेत.

स्थानकात काय असणार विशेष?

प्लॅटफॉर्म जमिनीपासून सुमारे 26 मीटर खाली असणार

हे स्थानक जवळपास 10 मजली इमारतीइतके खोल असेल

स्थानकात तीन मजले असतील, प्लॅटफॉर्म, कॉनकोर्स, सर्व्हिस फ्लोर

खोदकाम जवळपास 32 मीटरच्या खोलपर्यंत करण्यात येतेय.

स्थानकात 6 प्लॅटफॉर्म असतील, प्रत्येक प्लॅटफॉर्म 415 मीटर लांबीचा

स्थानक मेट्रो आणि रस्त्याशी देखील जोडलेले असणार

स्थानकात दोन एंट्री/एक्झिट पॉइंट असणार

स्कायलाइट असणार

नैसर्गिक प्रकाशासाठी एक स्कायलाइट देखील निर्माण करण्यात आला आहे. स्कायलाइटमुळे दिवसा स्थानकात सूर्यप्रकाश येईल, यामुळे वीजेची बचत होईल आणि स्थानक सुंदर दिसेल. बुलेट टेन प्रकल्प भारतासाठी एक मोठी कामगिरी ठरणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article