महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पर्यायी व्यवस्थेनंतरच पर्वरी उड्डाणपुलाचे काम

12:01 PM May 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची माहिती

Advertisement

पणजी : पर्यायी रस्ते आणि वाहतूक व्यवस्था यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतरच पर्वरी उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असल्याचे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत लवकरच संबंधित खात्यांची बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पावसाळी तयारीसाठी खंवटे यांनी काल गुरुवारी मंत्रालयात बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी सांगितले की, उड्डाणपुलाच्या कामास मान्यता मिळाली आहे. पर्वरी येथे मोठी वाहतूक कोंडी होते म्हणून त्यावर उपाययोजना करावी लागणार आहे. संबंधित पंचायतीकडून सूचना, आक्षेप मागवण्यात येणार असून पर्यायी रस्त्यांची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्षात काम सुरू होईल, असे ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article