वूडला दुसरी कसोटी हुकणार!
वृत्तसंस्था / ब्रिस्बेन
येत्या गुरूवारपासून येथे यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेतील दुसरी कसोटी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याला दुखापतीमुळे हुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मार्क वूडच्या गुडघ्याला ही दुखापत काही महिन्यांपूर्वी झाली होती. या दुखापतीवर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यामुळे तो 9 महिने क्रिकेटपासून अलिप्त होता. 2024 च्या ऑगस्टनंतर त्याने गेल्या आठवड्यात पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत आपला सहभाग दर्शविला होता. या सामन्यात त्याने दोन्ही डावांत 11 षटके टाकली पण त्याला एकही गडी बाद करता आला नाही. 35 वर्षीय मार्क वूडच्या या गुडघ्dयाला सूज आल्याने तो दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. ब्रिस्बेनची दुसरी कसोटी दिवसरात्रीची होणार असून या कसोटीत गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जाणार आहे.