महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुन्हा येथे येणार नाही...

06:58 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ग्रेटर नोएडाच्या खराब खेळपट्टीवरुन अफगाण बोर्ड संतापले : सलग दुसऱ्या दिवशी अफगाण-न्यूझीलंड सामन्याचा खेळ रद्द

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा

Advertisement

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी ग्रेटर नोएडा येथे खेळवली जात आहे. सोमवारी सामन्याचा पहिलाच दिवस ओल्या खेळपट्टीमुळे वाया गेला आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ पण रद्द करण्यात आला आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे मैदानाची दुरवस्था झाली असून, नोएडा स्टेडियममध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देखील नाहीत. नोएडाच्या या खराब व्यवस्थेमुळे आम्ही याठिकाणी पुन्हा खेळायला येणार नसल्याचे अफगाण क्रिकेट बोर्डाच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळवली जाणारी कसोटी ही ग्रेटर नोएडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मैदानावर होणारी पहिली कसोटी आहे. यापूर्वी या मैदानावर टी 20 आणि वनडे सामने खेळले गेले आहेत. मात्र, कसोटी सामन्याच्या दृष्टिकोनातून हे मैदान फ्लॉप असल्याचे दिसून आले. संपूर्ण खराब व्यवस्थापन आणि खराब प्रशिक्षण सुविधांचा अभाव यामुळे अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू थोडे निराश आहेत. हा मोठा गोंधळ आहे. आम्ही येथे परत येणार नाही, असे तो अधिकारी म्हणाला.

सामन्याचे दोन्ही दिवस वाया

पहिल्या दिवशी मैदान ओले असल्यामुळे नाणेफेकही होऊ शकली नाही. दुसऱ्या दिवशीही मैदानाची स्थिती सुधारली नसल्याचे चित्र पहायला मिळाले. कर्णधार टिम साऊदी, अष्टपैलू मिचेल सँटनर आणि रचिन रवींद्रसह न्यूझीलंडचे अनेक खेळाडू मैदानाची पाहणी करण्यासाठी आले होते. पण मिड ऑन आणि मिड विकेट हा चिंतेचा विषय होता, तर 30 यार्ड वर्तुळातही बरेच पॅच होते. यामुळे दुसऱ्या दिवसाचाही खेळ रद्द करण्यात आला.

चक्क मैदानातच खोदकाम

दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळपासून नोएडामध्ये ऊन होते. अशा परिस्थितीत हा खेळ लवकर सुरू व्हायला हवा होता, मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या छायाचित्रांमध्ये ग्राऊंड स्टाफ 30 यार्ड सर्कलमधील टर्फ काढून मैदानाची दुरुस्ती करण्यात व्यस्त असल्याचे दिसून आले. यावेळी ग्राउंड स्टाफ पंख्यांच्या साह्याने मैदाना कोरडे करण्याचा प्रयत्न करत होते, हे फोटो व्हायरल झाल्यावर मॅनेजमेंटवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

सोयी-सुविधांचा अभाव

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमधील कसोटी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग नसली तरी ती आयसीसीशी संलग्न आहे. नोएडा स्टेडियमवर अनेक अपुऱ्या सुविधा, अनअनुभवी स्टाफचा समावेश असल्याने सामन्याचे दोन्ही दिवस रद्द करावे लागले. अफगाण बोर्ड व न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने सपशेल नाराजी व्यक्त केली. यातच स्टाफला देण्यात येणाऱ्या जेवणाबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सोशल मीडियावर स्टेडिअमधले काही फोटो व्हायरल झाले असून जेवण बनवण्यासाठी कर्मचारी चक्क वॉशरुमधल्या पाण्याचा वापर करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article