For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला टी-20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर

06:32 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला टी 20 वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर
Advertisement

3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान बांगलादेशमध्ये रंगणार थरार

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने रविवारी जाहीर केले. 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा होणार असून एकूण 10 संघ स्पर्धेत सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, भारत व पाकिस्तान एकाच गटात असून ही हायव्होल्टेज लढत दि. 6 ऑक्टोबर रोजी होईल. बांगलादेशातील ढाका व सिल्हेट येथे वर्ल्डकपचे सामने होतील असे आयसीसीने यावेळी स्पष्ट केले.

Advertisement

आयसीसीने एकूण सहभागी 10 संघांना दोन गटात विभागले आहे. यानुसार ए ग्रुपमध्ये टीम इंडियासह न्यूझीलंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि क्वालिफायर 1 टीमचा समावेश करण्यात आला आहे. तर बी ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, यजमान बांगलादेश आणि क्वालिफायर 2 टीमचा समावेश असेल. प्रत्येक टीम साखळी फेरीत 4 सामने खेळणार आहेत. त्यानंतर प्रत्येक गटातून टॉप 2 टीम सेमी फायनलसाठी पात्र ठरतील. तीन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इंग्लंड व दक्षिण आफ्रिका सामन्याने विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होईल. यानंतर 17 दिवसात 23 सामने खेळवण्यात येणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 17 व 18 ऑक्टोबर रोजी होतील तर 20 ऑक्टोबरला ढाका येथे अंतिम सामना खेळवण्यात येईल.

भारत व पाकिस्तानातील चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात, असा पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांतील सामना दि. 6 ऑक्टोबर रोजी सिल्हेट येथे होणार आहे. भारतीय महिला संघाला आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळवता आलेले नाही, यामुळे यंदाच्या हंगामात भारतीय संघ वर्ल्डकप जिंकणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेतील गटवारी

ग्रुप ए - ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान व क्वालिफायर संघ 1.

ग्रुप बी - द. आफ्रिका, वेस्ट इंडिज, इंग्लंड, बांगलादेश व क्वालिफायर संघ 2.

महिला टी 20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक

3 ऑक्टोबर - इंग्लंड वि द. आफ्रिका, ढाका

3 ऑक्टोबर - बांगलादेश वि क्वालीफायर 2, ढाका

4 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि क्वालीफायर 1, सिल्हेट

4 ऑक्टोबर - भारत वि न्यूझीलंड, सिल्हेट

5 ऑक्टोबर - द. आफ्रिका वि वेस्ट इंडीज, ढाका

5 ऑक्टोबर - बांगलादेश वि इंग्लंड, ढाका

6 ऑक्टोबर - न्यूझीलंड वि क्वालीफायर 1, सिल्हेट

6 ऑक्टोबर - भारत वि पाकिस्तान, सिल्हेट

7 ऑक्टोबर - वेस्ट इंडीज वि क्वालीफायर 2, ढाका

8 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि पाकिस्तान, सिल्हेट

9 ऑक्टोबर - बांग्लादेश वि वेस्ट इंडीज, ढाका

9 ऑक्टोबर - भारत वि क्वालीफायर 1, सिल्हेट

10 ऑक्टोबर - द. आफ्रिका वि क्वालीफायर 2, ढाका

11 ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया वि न्यूजीलंड, सिल्हेट

11 ऑक्टोबर - पाकिस्तान वि क्वालीफायर 1, सिल्हेट

12 ऑक्टोबर - इंग्लंड वि वेस्ट इंडीज, ढाका

12 ऑक्टोबर -  बांग्लादेश वि द.आफ्रिका, ढाका

13 ऑक्टोबर - पाकिस्तान वि न्यूजीलंड, सिल्हेट

13 ऑक्टोबर - भारत वि ऑस्ट्रेलिया, सिल्हेट

14 ऑक्टोबर - इंग्लंड वि क्वालीफायर 2, ढाका

17 ऑक्टोबर - पहिली उपांत्य लढत, सिल्हेट

18 ऑक्टोबर - दुसरी उपांत्य लढत, ढाका

20 ऑक्टोबर - अंतिम लढत, ढाका

Advertisement
Tags :

.