महिला टी-20 विश्वचषक वेळापत्रक जाहीर
वृत्तसंस्था/ दुबई
महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमधून संयुक्त अरब अमिरातला हलविल्यानंतर आयसीसीने या स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले असून दुबई व शारजाह येथे स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
गटामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून सहावेळचे चॅम्पियन ऑस्ट्रेलियासह भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, लंका यांचा अ गटात समावेश आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज, बांगलादेश, स्कॉटलंड यांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीस अबु धाबी येथे झालेल्या महिला टी-20 विश्वचषक पात्रता स्पर्धेतून लंका व स्कॉटलंड यांनी मुख्य स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. प्रत्येक संघ गटसाखळीत चार सामने खेळेल आणि गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य लढती 17 व 18 ऑक्टोबर रोजी खेळविल्या जातील तर अंतिम लढत दुबईत 20 ऑक्टोबर रोजी खेळविली जाईल. उपांत्य व अंतिम सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. भारताने उपांत्य फेरी गाठल्यास पहिल्या उपांत्य सामन्यात ते खेळतील. स्पर्धेत एकूण 23 सामने होणार आहेत. त्याआधी 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 10 सराव सामने होणार आहेत.
महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा वेळापत्रक
तारीख संघ केंद्र वेळ
3 ऑक्टो. बांगलादेश वि. स्कॉटलंड शारजाह दु. 2
पाक वि. लंका शारजाह सायं 6
4 ऑक्टो. द.आफ्रिका वि. विंडीज दुबई दु. 2
भारत वि. न्यूझीलंड दुबई सायं. 6
5 ऑक्टो. बांगलादेश वि. इंग्लंड शारजाह दु. 2
लंका वि. ऑस्ट्रेलिया शारजाह सायं. 6
6 ऑक्टो. भारत वि. पाक दुबई दु. 2
विंडीज वि. स्कॉटलंड दुबई सायं. 6
7 ऑक्टो. इंग्लंड वि. द.आफ्रिका शारजाह सायं. 6
8 ऑक्टो. न्यूझीलंड वि. ऑस्ट्रेलिया शारजाह सायं. 6
9 ऑक्टो. द.आफ्रिका वि. स्कॉटलंड दुबई दु. 2
भारत वि. लंका दुबई सायं. 6
10 ऑक्टो. बांगलादेश वि. विंडीज शारजाह सायं. 6
11 ऑक्टो. ऑस्ट्रेलिया वि. पाक दुबई सायं. 6
12 ऑक्टो. न्यूझीलंड वि. लंका शारजाह दु. 2
बांगलादेश वि. द.आफ्रिका दुबई सायं. 6
13 ऑक्टो. इंग्लंड वि. स्कॉटलंड शारजाह दु. 2
भारत वि. ऑस्ट्रेलिया शारजाह सायं. 6
14 ऑक्टो. पाक वि. न्यूझीलंड दुबई सायं. 6
15 ऑक्टो. इंग्लंड वि. विंडीज दुबई सायं. 6
17 ऑक्टो. पहिला उपांत्य सामना दुबई सायं. 6
18 ऑक्टो. दुसरा उपांत्य सामना शारजाह सायं. 6
20 ऑक्टो. जेतेपदाची लढत दुबई सायं. 6.