मळगाव ग्रंथालयात महिला गीत गायन कार्यक्रम संपन्न
न्हावेली / वार्ताहर
मळगांव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर आयोजित स्व. सौ. उषा प्रकाश पाणदरे स्मृती प्रित्यर्थ श्री. प्रकाश पाणदरे पुरस्कृत 'स्वरसंध्या' हा महिलांसाठीचा गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महेश खानोलकर, प्रमुख अतिथी श्री प्रकाश पाणदरे निवेदक श्री शेखर पाडगावकर आदि मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचे ग्रंथालयातर्फे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथि श्री. प्रकाश पाणदरे यांनी आपल्या पत्नीला गायनाची विशेष आवड होती मात्र तिची गायन कला समाजा समोर आली नाही. मात्र मळगावच्या ग्रंथालयाने तिच्या स्मृती प्रित्यर्थ ग्रंथालयात गावातील महिला, माता, भगिनीसाठी, 'स्वरसंध्या' कार्यक्रमाद्वारे महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याबदल संस्थेचे कौतुक केले. यापुढेही मी या संस्थेच्या पाठीशी उभा राहून सदैव आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.या 'स्वरसंध्या' कार्यक्रमात कु. मधुरा खानोलकर कु. मुग्धा पंतवालावलकर, सौ. स्नेहा खानोलकर, सौ. दिपाली खानोलकर, सौ. उमा पंतवालावलकर, सौ. गौरी पाटकर, सौ. संगीता राऊळ, सौ. गौरी कुडव, सौ. प्राजक्ता नाईक, सौ. स्नेहल जामदार, कु. ऋजुता भागवत, कु. सलोनी गावकर, सौ राधिका कातळकर आदिनी आपल्या आवडीची गीते सादर करून रसिकांची वाहव्वा मिळविली.उपस्थित रसिक श्रोत्यामधून श्रीमती चेतना दाभोलकर, सौ. प्रतिमा पडवळ या दोन चोखंदळ रसिक श्रोत्यांची निवड कार्यक्रमाचे निवेदक श्री. शेखर पाडगांवकर यांनी करून त्यांना रोख पारितोषिक देवून त्यांचा गौरव केला. कार्यक्रमाला श्री. गोविद मळगांवकर तसेच श्री. प्रणित गोसावी यांची संगीत साथ लाभली कार्यक्रमा चे ध्वनी संयोजन आबा सावळ यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. पृथ्वीराज बांधेकर यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन श्री. शेखर पाडगांवकर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला रसिक प्रेक्षक ग्रामस्थ ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.