Solapur : महिला बचत गटाचा रुक्मिणी महोत्सवाला भरघोस प्रतिसाद !
रुक्मिणी दिवाळी महोत्सवाचे उद्घाटन सोलापूरमध्ये थाटात
दक्षिण सोलापूर : रुक्मिणी दिवाळी महोत्सव निमित्त १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद येथील स्टॉलचे पूजन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यात प्रत्येक वर्षी उमेद बचत गटातर्फे या स्टॉलचे आयोजन करण्यात येते. जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. यंदाही या कार्यक्रम नियोजन हे दोन दिवस असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन कुलदीप जंगम यांनी केले.
यावेळी प्रकल्प संचालक संचालक चंद्रशेखर जगताप,जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, सूर्यकांत भुजबळ राहुल जाधवं, जिल्हा व्यवस्थापक मार्केटिंग, संतोष डोंबे जिल्हा व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक उपजीविका मीनाक्षी मदोळे, प्रभाग समन्वयिका पंचशीला कसबे, दक्षिण सोलापूर उमेदचे शिवाजी वाघमारे, दिगंबर साळुंखे, दयानंद सरवळे,शुभांगी देशपांडे,लेखाधिकारी अनिता माने, ,शितल मंहंता, बचत गटाच्या शारदा बर्वे यांच्यासह स्टॉल धारक उपस्थित होते.