For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

solapur : औषध फवारणीसाठी शिवारात घुमणार ; आता महिला बचत गटाचे ड्रोन

06:10 PM Oct 13, 2025 IST | NEETA POTDAR
solapur   औषध फवारणीसाठी शिवारात घुमणार   आता महिला बचत गटाचे ड्रोन
Advertisement

                  ग्रामीण महिलांसाठी अनुदानित ‘ड्रोन’; जिल्हा परिषदेतून मोठा निर्णय

Advertisement

सोलापूर : ग्रामीण भागातील महिला बचत गटांतील महिलांच्या विकासासाठी जिल्हा सेस फंडातून ड्रोन परिषद खरेदीसाठी कमाल ४ लाख रुपयापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय ग्रामसंघाची यासाठी निवड करण्यात येणार आहे. बचत गटाकडून चालविण्यात येणारे ड्रोन शेतशिवारात औषध फवारणीसाठी आता घुमणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी दिली.

संदीप जिल्हा परिषद सोलापूर सेस फंडातून कृषी विभागकडून महिला शेतकरी सशक्तीकरण (महिला किसान शक्तीपंख योजना) या योजनेअंतर्गत ड्रोन या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे. ड्रोन - खरेदी अर्थसाहाय्य या घटकांतर्गत सेवा सुविधा केंद्र स्थापनेसाठी एकूण किमतीच्या ४० टक्के किंवा ४ लाखाच्या रक्कमेच्या मर्यादित राहून अनुदान देण्यात येत आहे.

Advertisement

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या कडील नोंदणीकृत असलेला तालुक्यातील महिलास ग्रामसंघ अर्ज करण्यास पात्र राहिल. महिला ग्रामसंघ लाभाथ्यांची निवड ही लॉटरी पध्दतीने ऑफलाईन करण्यात येईल. यासाठी तालुकास्तरावरून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

प्राप्त अर्जातून लॉटरी प्रक्रियेव्दारे लाभार्थी निवड झाल्यानंतर निवडपत्र लाभार्थीस देण्यात येईल. कृषी विभागाकडून सन २०२५-२६ करिता ड्रोन उत्पादकांचे यादीतील ड्रोन उत्पादकांपैकी कोणत्याही एका उत्पादकाकडून ड्रोन खरेदी करणे बंधनकारक आहे. इच्छुक महिला ग्रामसंघानी ०१ नोव्हेंबर २०२५ पर्यंत आपल्या पंचायत समिती कार्यालयाकडे परिपूर्ण कागदपत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिणकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.