For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिला प्रिमियर लीग आजपासून

06:00 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिला प्रिमियर लीग आजपासून
Advertisement

मुंबई इंडियन्स-दिल्ली सलामीची लढत

Advertisement

वृत्तसंस्था /बेंगळूर

महिलांच्या दुसऱ्या प्रिमियर लिग टी-20 क्रिकेट स्पर्धेला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स आणि विद्यमान उपविजेता दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. गेल्या वर्षी मुंबईत झालेल्या महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग टी-20 स्पर्धेत विदेशी क्रिकेटपटूंनी अधिक दर्जेदार कामगिरी केली होती. पण यावर्षी या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय महिला क्रिकेटपटू चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हरमनप्रित कौरकडे सोपविण्यात आले असून मेग लॅनिंग ही दिल्ली

Advertisement

कॅपिटल्सची कर्णधार आहे. मेग लॅनिंगने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. गेल्या वर्षी महिलांच्या पहिल्या प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेत तिने सर्वाधिक धावा जमवित ऑरेंज कॅपची मानकरी ठरली होती तर मुंबई इंडियन्स संघातील हिली मॅथ्यूज ही पर्पल कॅपची मानकरी झाली होती. तिने या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 16 गडी बाद केले होते. गेल्या वर्षी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारतीय महिलां क्रिकेटपटूंना कामगिरीतील आपले सातत्य राखण्यासाठी झगडावे लागले होते. मात्र यावेळी या स्पर्धेत अनेक नवोदित महिला क्रिकेटपटू लक्ष वेधून घेतील, अशी अपेक्षा आहे. रॉयल चॅलेंजर बेंगळूर संघातील श्रेयांका पाटील हिच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष राहिल. तिने यापूर्वीच्या काही सामन्यात संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे.

मुंबई इंडियन्स - हरमनप्रित कौर (कर्णधार), अमनज्योत कौर, अॅमेलिया केर, चोली ट्रायोन, हिली मॅथ्यूज, हुमारीया काझी, इसी वाँग, जे. कलिता, नॅट सिव्हरर ब्रंट, पूजा वस्त्रकार, प्रियांका बाला, सारिका इशाकी, यास्तीका भाटीया, शबनीम इस्माईल, एस. संजना, अमनदीप कौर, फातिमा जाफर, कीर्तना बालकृष्णन.

दिल्ली कॅपिटल्स : मेग लॅनिंग (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्ज, लॉरा हॅरिस, शेफाली वर्मा, अॅलिस कॅप्से, अॅनाबेल सदरलँड, अरुंधती रे•ाr, अश्विनी कुमारी, जेस जोनासेन, मारीझेना कॅप, स्नेहा दीप्ती, मिन्नू मनी, राधा यादव, शिखा पांडे, अर्पणा मोंडल, तानिया भाटीया, पूनम यादव, तितास साधू.

थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18

Advertisement
Tags :

.