महिला प्रीमियर लीग 9 जानेवारी ते 5 फ्रेबुवारी पर्यंत
मुंबई व वडोदरा येथे होणार सामने
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महिला प्रीमीयर लीगची चौथी आवृती नवी मुंबई आणि वडोदरा येथे 9 जानेवारीपासून सुरु होणार आहे. फेब्रवारी-मार्च दरम्यान होणारी हि स्पर्धा पुरुषांच्या टी-20 लीगमुळे महिलाची स्पर्धा यंदा लवकर भरविण्यात आले आहे. तर 7 फेब्रवारीपासून पुरुषांची टी-20 सामने सुरु होणार आहेत.
महिला प्रीमीयर लीगचे आगामी आवृत्ती नवी मुंबईत खेळवली जाईल आणि अंतिम सामना वडोदरा येथे होईल. टी-20 चे अध्यक्ष जयेश जॉर्ज यांनी महिलाच्या लीगच्या लिलावादरम्यान केले आहेत. लीग पुन्हा एकदा करर्व मॉडेलमध्ये खेळवली जाईल, पहिला अर्धा भाग डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवला जाईल, त्याच ठिकाणी जिथे भारताने या महिन्याच्या सुरुवातील महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.त्यांनर वडोदरा येथे स्थलांतरित केला जाईल, जिथे अंतिम सामना 5 फेब्रवारी रोजी होणार आहे.