कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलांची प्रीमियर लीग स्पर्धा 9 जानेवारीपासून

06:32 AM Nov 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

28 दिवसांची स्पर्धा, एकूण 22 सामने, दोन ठिकाणी सामने

Advertisement

वृत्तसंस्था / मुंबई

Advertisement

महिलांच्या चौथ्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेला 9 जानेवारीपासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत नव्या मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियमवर आरसीबी बेंगळूर आणि विद्यमान विजेता मंबई इंडियन्स यांच्यात सलामीचा सामना खेळविला जाईल.

ही स्पर्धा 28 दिवस चालणार असून ती मुंबई आणि बडोदा अशा दोन ठिकाणी खेळविली जाणार आहे. नव्या मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर तर बडोद्यातील कोटांबी स्टेडियमवर या स्पर्धेतील सामने खेळविली जातील. अलिकडेच महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात आला होता आणि भारताने द. आफ्रिकेचा पराभव करुन विश्वचषकावर आपले नाव पहिल्यांदाच कोरल्याने डी. वाय. पाटील स्टेडियमचे नाव आता अधिकच झळकत आहे. या स्पर्धेतील पहिले 11 सामने डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविले जातील. शनिवारी या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने दुपारच्या सत्रात तर उर्वरीत सामने सायंकाळच्या सत्रात होतील. पहिल्या टप्प्यानंतर या स्पर्धेतील दुसरा टप्पा बडोदा येथे होईल. बडोद्याच्या कोटांबी स्टेडियमवर या स्पर्धेतील उर्वरित 11 सामने खेळविले जातील. 2 फेब्रुवारीला एलिमिनेटरचा सामना तर 5 फेब्रुवारीला अंतिम सामना होईल.

महिलांची प्रीमियर लीग टी-20 स्पर्धा यावेळी पहिल्यांदाच जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान होत आहे. यापूर्वीच्या या तीन स्पर्धा फेब्रवारी मार्च दरम्यान झाल्या होत्या. या स्पर्धेच्या फॉर्मेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर, युपी वॉरियर्स, गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे पाच संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. सदर स्पर्धा दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविली जाणार असून प्रत्येक संघ दुसऱ्या संघाबरोबर दोनवेळा लढत देईल. त्यानंतर आघाडीचे दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघामध्ये एलिमिनेटरचा सामना घेतला जाणार आहे.

हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ही स्पर्धा दोनवेळा जिंकली आहे. 2024 च्या महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने दिल्ली कॅपिटल्सचा अंतिम सामन्यात पराभव करुन विजेतेपद मिळविले. तत्पूर्वी मुंबई इंडियन्सने या स्पर्धेच्या तीन हंगामांमध्ये दोनवेळा अजिंक्यपद मिळविले होते. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने या स्पर्धेच्या तीन हंगामात उपविजेतेपद मिळविले आहे. गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्स या संघांना अद्याप एकदाही अंतिम फेरी गाठता आलेली नाही. 2026 ची महिलांची टी-20 प्रीमियर लीग स्पर्धा संपल्यानंतर 10 दिवसांच्या अंतराने भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघ तीन टी-20 सामने, तीन वनडे सामने आणि एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियातील भारतीय महिला संघाच्या या मालिका 15 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान होतील.

नवी मुंबई

तारीख                             संघ

9 जानेवारी               मुंबई इंडियन्स वि. आरसीबी

10 जानेवारी           युपी वॉरियर्स वि. गुजरात जायंट्स

मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स

11 जानेवारी          दिल्ली कॅपिटल्स वि. गुजरात जायंट्स

12 जानेवारी        आरसीबी वि. युपी वॉरियर्स

13 जानेवारी        मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स

14 जानेवारी       युपी वॉरियर्स वि. दिल्ली कॅपिटल्स

15 जानेवारी     मुंबई इंडियन्स वि. युपी वॉरियर्स

16 जानेवारी      आरसीबी वि. गुजरात जायंट्स

17 जानेवारी     युपी वॉरियर्स वि. मुंबई इंडियन्स

दिल्ली कॅपिटल्स वि. आरसीबी

बडोदा

19 जानेवारी       गुजरात जायंट्स वि. आरसीबी

20 जानेवारी        दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स

22 जानेवारी       गुजरात जायंट्स वि. युपी वॉरियर्स

24 जानेवारी       आरसीबी वि. दिल्ली कॅपिटल्स

26 जानेवारी       आरसीबी वि. मुंबई इंडियन्स

27 जानेवारी       गुजरात जायंट्स वि. दिल्ली कॅपिटल्स

29 जानेवारी       युपी वॉरियर्स वि. आरसीबी

30 जानेवारी        गुजरात जायंट्स वि. मुंबई इंडियन्स

1 फेब्रुवारी        दिल्ली कॅपिटल्स वि. युपी वॉरियर्स

3 फेब्रुवारी        एलिमिनेटर सामना

5 फेब्रुवारी        अंतिम सामना

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article