महिलांची वनडे विश्वचषक स्पर्धा आजपासून
श्रीलंकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात विजयी सुरुवात करण्यास भारतीय महिला सज्ज
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा आणि सध्याच्या चांगल्या फॉर्मसह भारतीय महिला क्रिकेट संघ आज मंगळवारी येथे श्रीलंकेविऊद्धच्या सामन्याने आपल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकातील मोहीम सुरू करताना 47 वर्षांपासून चाललेली पहिल्या आयसीसी जेतेपदाची प्रतीक्षा संपविण्याचे ध्येय बाळगून असेल.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारत 12 वर्षांनंतर भारतात परतलेल्या स्पर्धेच्या 13 व्या आवृत्तीत परिचित परिस्थितीचा जास्तीत जास्त फायदा उठविण्याचा प्रयत्न करेल. या जागतिक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तान या आठ अव्वल क्रमांकांच्या संघांचा समावेश आहे. भारतातील चार ठिकाणी आणि कोलंबोमध्ये एका ठिकाणी राउंड-रॉबिन स्वरूपात 28 साखळी सामने होणार असून या स्पर्धेत 13.88 दशलक्ष डॉलर्सची विक्रमी बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे. बक्षीस रक्कम 2022 च्या तुलनेत जवळजवळ चार पट जास्त आहे आणि पुऊषांच्या 2023 च्या विश्वचषकापेक्षा (10 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स) जास्त आहे. आयसीसीच्या वेतन समानता आणि महिला क्रिकेटच्या वाढीच्या प्रयत्नांशी हे सुसंगत आहे. श्रीलंकेची राजधानी 11 राउंड-रॉबिन सामने आयोजित करेल, ज्यामध्ये पाकिस्तानचे सात साखळी स्तरावरील सामने आणि 5 ऑक्टोबर रोजी होणारा भारताविऊद्धचा सामना समाविष्ट आहे. जर पाकिस्तानने आगेकूच केली, तर एक उपांत्य फेरी आणि अंतिम सामना देखील तेथेच होणार आहे.
सध्याच्या फॉर्म पाहता भारत आत्मविश्वासाने भरलेला आहे. त्यांनी अलीकडेच एकदिवसीय आणि टी20 मालिकेत इंग्लंडला हरवले आहे. त्यांनी या स्पर्धेपूर्वीच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाविऊद्धची चिंताजनक पराभवाची मालिका देखील संपवली. विक्रमी आठव्या जेतेपदाचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध नवी दिल्लीतील शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने 413 धावांचा पाठलाग जवळजवळ केला होता. भारतीय उपकर्णधार स्मृती मानधना फलंदाजीचा आधारस्तंभ आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने या वर्षी ऑस्ट्रेलियाविऊद्ध सलग दोन शतकांसह चार एकदिवसीय शतके झळकावली आहेत. तिची सरासरी 66.28 आहे आणि तिचा स्ट्राईक रेट 115.85 आहे. युवा सलामीवीर प्रतीका रावलसोबतच्या तिच्या भागीदारीमुळे शफाली वर्माच्या अनुपस्थितीत भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मदत झालेली आहे.
पाचवा विश्वचषक खेळत असलेली हरमनप्रीत तिचे सर्वोत्तम प्रदर्शन मोठ्या स्पर्धांसाठी राखून ठेवते असे आजवर दिसून आलेले आहे. तिची स्पर्धा सरासरी 50 पेक्षा जास्त आहे. तिने अलीकडेच इंग्लंडविऊद्ध शतक झळकावले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविऊद्ध अर्धशतक झळकावले. दुखापतीतून परतलेल्या जेमिमा रॉड्रिग्जने इंग्लंडविऊद्धच्या सराव सामन्यात 66 धावा केल्या. तिच्यामुळे मधल्या फळीत स्थिरता आली आहे. रिचा घोष, हरलीन देओल आणि दीप्ती शर्मा यांनी आणखी खोली वाढवली आहे, तर अमनजोत कौरमुळे मध्यमगती गोलंदाजी करू शकणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
दुखापतीतून रेणुका सिंहचे पुनरागमन वेगवान माऱ्याला बळकटी देईल. 22 वर्षीय क्रांती गौड, जी फक्त सहा सामने खेळली आहे, तिने तिच्या वेगवान गोलंदाजीत आणि विविधतेमध्ये आशादायक चित्र दाखवले आहे. तिने इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराह व कुलदीप यादव यांच्यासोबत एकदिवसीय सामन्यात भारतातर्फे सहा बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळविताना चेस्टर-ले-स्ट्रीटवर 52 धावांत 6 बळी टिपले. तथापि, भारताचा वेगवान विभाग अनुभवाच्या बाबतीत कमकुवत आहे.
रेणुका वगळता इतर वेगवान गोलंदाज-क्रांती, अऊंधती रे•ाr आणि अमनजोत या मिळून फक्त 25 एकदिवसीय सामने खेळल्या आहेत आणि अलीकडच्या काळात भारतीय गोलंदाजीने 300 पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. रे•ाrला सराव सामन्यात दुखापत झाल्यानंतर व्हीलचेअरवर बसून मैदान सोडावे लागल्यामुळे दुखापती हा देखील चिंतेचा विषय आहे. न्यूझीलंडविऊद्धच्या शेवटच्या सराव सामन्यात पुनरागमन करण्यापूर्वी अमनजोतलाही दुखापत झाली होती. दीप्ती शर्मा, राधा यादव, स्नेह राणा आणि एन. श्रीचरणी यांच्या नेतृत्वाखालील फिरकी मारा घरच्या परिस्थितीचा विचार करता अनुरूप आहे, परंतु पाटा खेळपट्टीवर चेंडू किती वळण घेईल हे पाहावे लागेल.
भारतासमोरील सर्वांत मोठे आव्हान मानसिक असू शकते. कारण इतिहासात असे दिसून आले आहे की, भारतीय संघ कठीण परिस्थितीत डगमगतो. 2017 च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आणि अलीकडच्या काळात 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविऊद्ध त्यांना पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे, 2022 मध्ये पात्रता न मिळाल्यानंतर चमारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघ विश्वचषकात पुनरागमन करत आहे. श्रीलंका 20 वर्षीय अष्टपैलू देउमी विहंगावर अवलंबून असेल, जिने आधीच या स्वरूपात आपली चमक दाखवली आहे. दक्षिण आफ्रिकेविऊद्धच्या सामन्यात 43 धावांत मिळविलेल्या 5 बळींसह तिरंगी मालिकेत तिने एकूण 11 बळी घेतले आणि ती स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज ठरली. त्यांचे पाच लीग सामने घरच्या मैदानावर होणार असल्याने परिचित परिस्थिती आणि प्रेक्षकांच्या चांगल्या पाठिंब्यामुळे त्यांना बळकटी मिळेल आणि ते पहिल्या चार संघांत स्थान मिळवू शकतात.
सामन्याची वेळ : दुपारी 3 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, जिओ हॉटस्टार