नव्या स्वरुपातील ‘एएफसी चॅम्पियन लीग’मुळे महिला फुटबॉलला मोठी चालना
वृत्तसंस्था/ कौलालंपूर
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील काही प्रभावी कामगिरींमुळे आशियातील महिला फुटबॉल विभाग एका वेगळ्या स्तरावर उंचावल्यानंतर आता नवीन एएफसी चॅम्पियन्स लीगसाठीच्या अपेक्षा वाढल्या आहेत. उद्या गुरुवारपासून ही लीग सुरू होणार आहे.
गेल्या महिन्यात महिलांच्या 20 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत उत्तर कोरियाने जपानवर मिळविलेल्या विजयामुळे संपूर्ण खंडाचे लक्ष महिलांच्या खेळावर पुन्हा केंद्रीत झाले आहे. गेल्या वर्षी न्यूझीलंडसह आयोजित केलेल्या महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीपर्यंत धाव घेतली होती. त्यामुळे विक्रमी संख्येने गर्दी लोटून या क्षेत्रातील प्रतिभेकडे लक्ष वेधले गेले होते.
आता या खंडीय क्लब स्पर्धेच्या रचनेत सुधारणा करण्यात आली असून महिला आशियाई चॅम्पियन्स लीगचा गट टप्पा या आठवड्यात सुरू होत आहे. त्यात उरावा रेड डायमंडच्या महिला जपानचा ध्वज फडकवतील. ‘एएफसी’च्या महिला चॅम्पियन्स लीगची ‘पायलट’ स्पर्धा असलेल्या आणि मे महिन्यात झालेल्या महिला क्लबांच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत उरावा रेड डायमंडने दक्षिण कोरियाच्या इंचॉन रेड एंजल्सचा पराभव केला होता. त्या यशाची पुनरावृत्ती करण्यास तो संघ निश्चितच उत्सुक असेल.
ही 12 संघांची स्पर्धा असून त्यापैकी चार संघांनी प्राथमिक टप्प्यातून प्रगती केली आहे. प्रत्येकी चार संघांचे तीन गट पाडण्यात आले आहेत. उरावा गुऊवारी भारताच्या ओडिशाविऊद्धच्या सामन्याने सुऊवात करेल आणि त्यानंतर हो ची मिन्ह सिटी तसेच तैवानी संघ ताइचुंग ब्लू व्हेलशी त्यांचा सामना होईल. गट ‘क’चे सामने व्हिएतनाममध्ये होतील आणि प्रत्येक गटातील सामने नऊ दिवसांच्या कालावधीत एकाच ठिकाणी खेळविले जातील. प्रत्येक गटातून अव्वल दोन संघ पुढील मार्चमध्ये होणार असलेल्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील आणि तिसऱ्या स्थानावरील दोन सर्वोत्तम संघ त्यांना येऊन मिळतील. सेमीफायनल आणि फायनल मे, 2025 मध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा मेलबर्न सिटी संघ ‘ब’ गटात असून त्यांची सुऊवात थायलंडमध्ये इराणच्या बाम खातूनविऊद्ध होईल. मेलबर्न सिटीचा सामना त्यानंतर फिलिपीन्सच्या काया-इलोइलो आणि थायलंडच्या कॉलेज ऑफ एशियन स्कॉलर्सशी होईल. मलेशियाचा सबाह, चीनचा वुहान जिआंगडा आणि संयुक्त अरब अमिरातीचा अबू धाबी कंट्री क्लब यांच्यासह इंचॉन रेड एंजल्स ‘अ’ गटात आहे.