For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांमध्ये धाराशिव-सांगली यांच्यात अंतिम लढत

06:03 AM Mar 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
महिलांमध्ये धाराशिव सांगली यांच्यात अंतिम लढत
Advertisement

पुरुषांमध्ये पुणे- मुंबई उपनगर जेतेपदासाठी आमनेसामने

Advertisement

प्रतिनिधी/ शेवगाव, अहिल्यानगर

येथील खंडोबा मैदानावर सुरू असलेल्या हिरकमहोत्सवी पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळणार आहे. पुरुष गटात पुणे विरुद्ध मुंबई उपनगर तर महिला गटात धाराशिव विरुद्ध सांगली यांच्यात अंतिम सामन्यांची लढत रंगणार आहे.

Advertisement

पहिल्या उपांत्य सामन्यात पुण्याने सांगलीचा 1 गुण व 5 मिनिटे 30 सेकंद राखून (18-17) पराभव केला. पुणे संघात शुभम थोरात (1.30, 1.30 मि. संरक्षण व 4 गुण), रुद्र थोपटे (5 गुण), शिवराम शिंगाडे (1, 3 मि. संरक्षण) यांनी महत्वाची भूमिका बजावली. सांगलीतर्फे मिलिंद चावरेकर (1.10 मि. संरक्षण व 6 गुण) याने आक्रमक खेळ करत संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याला अभिषेक केरीपाळे (1.20 मि. व 3 गुण) याची चांगली साथ मिळाली. सांगली संघाने पहिल्या डावात आक्रमक खेळ केला, मात्र मध्यंतरानंतर ते सातत्य राखू शकले नाहीत. दुसऱ्या उपांत्य सामन्यात मुंबई उपनगरने धाराशिवचा 7 गुणांनी (20-13) पराभव केला. मध्यंतराला मुंबई उपनगर संघाकडे 3 गुणांची (10-7) आघाडी होती, जी धाराशिव मोडीत काढू शकला नाही. यामुळे अंतिम सामना पुणे विरुद्ध मुंबई उपनगर संघात रंगणार आहे.

महिला गटातील अंतिम सामना धाराशिव विरुद्ध सांगली

महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात धाराशिव संघाने पुण्याचा 1 गुण व 7.50 मिनिटे राखून (10-9) पराभव केला. धाराशिव संघात अश्विनी शिंदे (2.20, 2.10 मि. संरक्षण), संपदा मोरे (2.10, 1.50 मि. संरक्षण व 1 गुण), संध्या सुरवसे (1, 2.50 मि. संरक्षण व 1 गुण), सुहानी धोत्रे (1.10, 1 मि. नाबाद संरक्षण व 4 गुण) यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात सांगलीने नाशिकचा 1 गुण व 1 मिनिट राखून (12-11) विजय मिळवला. सांगली संघात सानिका चाफे (3 मि., 3.40 मि. संरक्षण व 1 गुण), रिया चाफे (1.30, 1 मि. संरक्षण व 1 गुण), प्रतीक्षा बिराजदार (1 मि., 2.40 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चमकदार कामगिरी केली. नाशिक संघात कौशल्या पवार (1, 2.30 मि. संरक्षण व 4 गुण), सरिता दिवा (1.20, 1.50 मि. संरक्षण व 1 गुण) यांनी चांगला खेळ केला.

Advertisement
Tags :

.