महिला क्रिकेटपटूंचा लिलाव 27 नोव्हेंबरला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आगामी महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी क्रिकेटपटूंचा लिलाव येथे 27 नोव्हेंबर रोजी आयोजित केला आहे. या लिलावात भारताची विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील स्टार खेळाडू दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकुर यांच्यासह 277 महिला क्रिकेपटूंचा समावेश राहील.
महिलांच्या प्रीमियर लीग टी-20 आगामी स्पर्धेसाठी प्रसारमाध्यम सल्लागार समितीने दिलेल्या माहितीनुसार, महिला क्रिकेपटूंच्या लिलावावेळी एकूण 19 क्रिकेटपटूंसाठी किमान बोलीची रक्कम 50 लाख रुपये राहील. तर 11 क्रिकेटपटूंसाठी 40 लाख तसेच 88 क्रिकेटपटूंसाठी 30 लाख रुपये राहील. 277 महिला क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये 194 भारतीय महिला क्रिकेटपटूंचा समावेश आहे. त्यामध्ये 142 नवोदित महिला तर 52 नियमित क्रिकेटपटू राहतील. या लिलावामध्ये 17 नवोदितांसह एकूण 66 विदेशी महिला क्रिकेटपटूंचा सहभाग राहणार आहे. 23 रिक्त झालेल्या जागांसाठी 17 विदेशी नवोदित खेळाडूंना संधी दिली जाणार आहे.
भारतीय महिला संघातील अष्टपैलू दीप्ती शर्मा, हर्लिन देवोल, प्रतीका रावल, पूजा वस्त्रकर, उमा छेत्री आणि क्रांती गौड या सहा खेळाडूंसाठी बोलीची किमान रक्कम 50 लाख रुपये राहील. त्याचप्रमाणे न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन आणि अॅमेलिया केर, इग्लंडची सोफी इक्लेस्टोन, ऑस्ट्रेलियाच्या अॅलिसा हिली आणि मेग लेनिंग या विदेशी क्रिकेटपटूंचाही या गटात समावेश करण्यात आला आहे. एकूण 19 महिला क्रिकेटपटूंसाठी बोलीची किमान रक्कम 50 लाख रुपये तर 11 क्रिकेटपटूंसाठी किमान बोलीची रक्कम 40 लाख तसेच 88 क्रिकेटपटूंसाठी बोलीची किमान रक्कम 30 लाख रुपये राहील.
महिलांच्या प्रीमियर लीग स्पर्धेसाठी 5 फ्रांचायझींना या बोलिमध्ये कमाल 18 खेळाडूंना खरेदी करण्याची मुभा राहील. 17 खेळाडूंची निवड करताना त्यामध्ये 7 विदेशी खेळाडूंचा समावेश राहील. 5 संघांसाठी एकूण लिलावाची रक्कम 41.1 कोटी रुपये राहील. 27 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महिला क्रिकेटपटूंच्या लिलाव कार्यक्रमाला दीप्ती शर्मा, रेणुका सिंग ठाकुर, सोफी डिव्हाईन, सोफी इक्लेस्टोन, अॅलिसा हिली, अॅमेलिया केर, मेग लेनिंग आणि द. आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड यांच्यापासून प्रारंभ होईल.