Sangli : सांगलीत महिला क्रिकेट विश्वचषक विजयी जल्लोष !
सांगलीत फटाक्यांची आतषबाजी आणि उत्साहाचा उफाळा
सांगली : भारतीय महिला संघाने द. अफ्रिका यांच्यासोबत झालेल्या अंतिम सामन्यात द. अफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करुन वर्ल्डकपबर पहिल्यांदाच आपले नाव कोरले आणि आपला महिला संघही जगतजेता आहे हे दाखवून दिले. हा अंतिम सामना जिंकल्यानंतर संपूर्ण देशात फटाक्याची आतषबाजी करुन दुसऱ्यादा दिवाळी साजरी करण्यात आली. सांगलीतही विविध परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला.
नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील स्टेडीयमबर खेळल्या गेलेल्या भारत विरुद्ध द. अफ्रिका सामन्यात भारतीय महिला संघाने विजय प्राप्त केला. फायनलचा विजेता ठरत भारताने पहिल्यांदाच महिला क्रिकेट वर्ल्डकपवर स्वतःचे नाव कोरले आहे. या यशामुळे सांगलीत गणपती पेठ, बालाजी चौक, मारुती चौक, गावभाग, खणभाग विश्रामबाग परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत मोठा विजयी जल्लोष करण्यात आला.
सांगलीच्या स्मृतीचा वर्ल्ड कपमध्ये डंका
महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये टीम इंडियाची स्टार सलामीवीर स्मृती मानधना हिने जबरदस्त कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या फलंदाजीच्या बळावर ती या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक धाबा करणारी फलंदाज ठरली आहे. एवढंच नव्हे, तर तिने महान फलंदाज मिताली राज हिचा विक्रम मोडीत काढला आहे. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्मृतीने ५८ चेंडूत ८ चौकारांसह ४५ धावा केल्या. या खेळीमुळे ती एका वर्ल्ड कप हंगामात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली. पूर्वी हा विक्रम मिताली राजच्या नावाबर होता, जिने २०१७ च्या वर्ल्ड कपमध्ये ४०९ धावा केल्या होत्या.