महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिलांच्या चॅम्पियन्स लीगचा ड्रॉ जाहीर

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

2024-25 च्या होणाऱ्या महिलांच्या एएफसी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यासाठी येथे गुरुवारी ड्रॉ काढण्यात आला. या ड्रॉनुसार इंडियन क्लब ओडिशा एफसी संघाचा ब गटात समावेश करण्यात आला आहे. ब गटामध्ये इंडियन क्लब ओदीशा एफसी, इतिहाद क्लब जॉर्डन, लायन सिटी सेलर्स एफसी-सिंगापूर यांचा समावेश आहे. ओदीशा एफसी संघाने 2023-24 च्या हंगामात भारतीय महिला लिग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले होते. आता जॉर्डनमध्ये होणाऱ्या एएफसी महिलांच्या चॅम्पियन्स लिग फुटबॉल स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यासाठी ओदीशा एफसी संघ जॉर्डनला प्रयाण करणार आहे. या प्राथमिक संघातील सामने लिग पध्दतीनुसार 25 ते 31 दरम्यान खेळविले जाणार आहेत. या प्राथमिक टप्प्यामध्ये एकूण 13 संघांचा समावेश राहिल. हे 13 संघ चार गटात विभागण्यात आले असून यापैकी एक गटात चार संघ तर उर्वरित तीन गटामध्ये प्रत्येकी 3 संघांचा समावेश राहिल. या चारही गटातील आघाडीचे संघ 12 संघांच्या ग्रुप टप्प्यासाठी पात्र ठरतील. पुढील टप्प्यासाठी पात्रतेकरिता ओदिशा एफसी संघाला प्राथमिक टप्प्यात आपल्या गटातून आघाडीचे स्थान मिळवावे लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article