महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महिलांची आशिया चषक टी-20 स्पर्धा

06:28 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जुलैमध्ये, 19 जुलैपासून चॅम्पियनशिपला लंकेत सुरुवात, 28 जुलैला अंतिम लढत

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisement

महिलांच्या आशिया चषक टी-20 चॅम्पियनशिप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यमान विजेता भारत व पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांचा यूएई, नेपाळ यांच्यासह अ गटात समावेश करण्यात आला आहे. लंकेतील डंबुला येथे 19 जुलैपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत आठ संघांचा सहभाग असेल. मागील वेळेपेक्षा यात सात संघांचा सहभाग होता. मागच्या वेळेप्रमाणे आठ संघांचे दोन गट करण्यात आले असून लंका, बांगलादेश, थायलंड, मलेशिया यांचा ब गटात समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील आणि 26 जुलै रोजी उपांत्य लढती तर 28 जुलै रोजी अंतिम लढत होईल.

या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय महिला संघाने सर्वाधिक यश मिळविले असून तब्बल सातवेळा ही स्पर्धा त्यांनी जिंकली आहे. आगामी स्पर्धेत भारत व पाक ही सर्वात महत्त्वाची व लक्षवेधी लढत 21 जुलै रोजी खेळविली जाईल. ‘संघांचा वाढता सहभाग व त्यांच्यातील स्पर्धात्मकता पाहून आम्ही उत्साहित झालो आहोत. महिला क्रिकेटची वाढती लोकप्रियताच त्यातून प्रतिबिंबित होते. 2018 मध्ये सहा, त्यानंतर 2022 मध्ये 7 व आता आठ संघांचा सहभाग यातून महिला क्रिकेटबद्दलची आमची बांधिलकी आशियाई क्रिकेटमधील वाढती गुणवत्ताच दिसून येते,’ असे एसीसीचे अध्यक्ष जय शहा म्हणाले. मागील वेळेप्रमाणे यावेळीही या स्पर्धेत फक्त महिला अंपायर्स काम पाहणार असून येत्या सप्टेंबरमध्ये बांगलादेशमध्येच महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही होणार आहे. त्यादृष्टीने आशिया चषक स्पर्धा तयारीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.

महिला आशिया चषक टी-20 चॅम्पियनशिपचे वेळापत्रक

19 जुलै           पाक वि. नेपाळ, भारत वि. यूएई

20 जुलै          मलेशिया वि. थायलंड, लंका वि. बांगलादेश

21 जुलै           नेपाळ वि. यूएई, भारत वि. पाक

22 जुलै          लंका वि. मलेशिया, बांगलादेश वि. थायलंड

23 जुलै           पाक वि. यूएई, भारत वि. नेपाळ

24 जुलै          बांगलादेश वि. मलेशिया, लंका वि. थायलंड

26 जुलै          उपांत्य लढती

28 जुलै          अंतिम लढत.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article