For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रादेशिक सैन्यात सामील होऊ शकणार महिला

06:11 AM Nov 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रादेशिक सैन्यात सामील होऊ शकणार महिला
Advertisement

नारीशक्तीचे नवे उड्डाण : प्रायोगिक तत्वावर सैन्याकडून होतोय विचार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय सैन्य महिलांसाठी संधीचे नवे दार उघडण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार सैन्याने टेरिटारियल आर्मीच्या (प्रादेशिक सैन्य) काही बटालियन्समध्ये महिला कॅडरच्या भरतीचा प्रस्ताव विचारासाठी ठेवला आहे. सुरुवात एक प्रायोगिक प्रकल्प म्हणून होणार आहे, म्हणजे सध्या काही युनिट्समध्येच महिलांना स्थान दिले जाणार आहे. पुढील काळात निष्कर्ष आणि अनुभवांच्या आधारावर याची व्याप्ती वाढविली जाऊ शकते.

Advertisement

सरकार दीर्घकाळापासून सशस्त्र दलांमध्ये ‘नारीशक्ती’वर जोर देत आहे. सैन्य देखील स्वत:च्या संरचनेत महिलांच्या भूमिकेला हळूहळू विस्तार देत आहे. सद्यकाळात महिला सैन्याच्या 10 मोठ्या शाखा इंजिनियर्स, सिग्नल्स, एअर डिफेन्स, एएससी, एओसी, ईएमई, आर्मी एव्हिएशन, इंटेलिजेन्स, जेएजी आणि एज्युकेशन कॉर्प्समध्ये सेवा बजावत आहेत.

काय आहे प्रादेशिक सैन्य?

टेरिटोरियल आर्मीला 18 ऑगस्ट 1948 रोजी कायद्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आले होते. नंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांनी 9 ऑक्टोबर 1949 रोजी याचे औपचारिक उद्घाटन केले. याचे वैशिष्ट्या नागरिक सैनिकाचा (सिटिजन सोल्जर)विचार, म्हणजेच देशसेवेचा ध्यास असलेले, परंतु नियमित सैन्यात सामील होण्यासाठीचे वय ओलांडलेल्या लोकांना याच्या माध्यमातून सैन्याचा गणवेश परिधान करण्याची संधी मिळते.

प्रादेशिक सैन्याचे वर्तमान स्वरुप

प्रादेशिक सैन्यात सध्या सुमारे 50000 सैनिक आहेत, यात 65 विभागीय शाखा (उदाहरणार्थ रेल्वे, आयओसी, ओएनजीसी) आणि अनेक बिगर विभागीय टेरिटोरियल आर्मी बटालियन्स सामील आहेत. यात इन्फंट्री, होम अँड हार्थ बटालियन, पर्यावरण संरक्षणाशी निगडित इकोलॉजिकल बटालियन, एलओसीवर कुंपणाची देखभाल करणारी इंजिनियर रेजिमेंट सामील आहे.

युद्ध-अभियानांमध्ये महत्त्वाची भूमिका

‘टेरियर्स’ म्हणजेच टेरिटोरियल आर्मी जवानांनी देशाच्या अनेक मोठ्या सैन्य अभियानांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, यात 1962, 1965 आणि 1971 युद्ध, श्रीलंकेतील ऑपरेशन पवन, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन रक्षक, ईशान्येच्या राज्यांमध्ये ऑपरेशन राइनो आणि बजरंग सामील आहे.

Advertisement
Tags :

.