For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजन तेलींच्या प्रवेशामुळे मठ गावात उबाठा सेनेला धक्का

06:42 PM Oct 19, 2024 IST | अनुजा कुडतरकर
राजन तेलींच्या प्रवेशामुळे मठ गावात उबाठा सेनेला धक्का
Advertisement

प्रवेश मान्य नसल्याने युवती, महिलांनी केला शिवसेनेत प्रवेश : उबाठा शिवसेनेला धक्का

Advertisement

वेंगुर्ले (प्रतिनिधी)-

येथील शिवसेना कार्यालयात शनिवार १९ ऑक्टोबर रोजी मठ गावातील ३५ महिलांनी राजन तेलींनी उबाठा शिवसेनेत प्रवेश केल्याने नाराज होत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.मठ गावच्या माजी ग्रामपंचयात सदस्य यमती नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक ऍड. निता सावंत-कविटकर, उपजिल्हा संघटक शितल साळगावकर व तालुका महिला संघटक दिशा शेटकर यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरात महिला शहर महिला संघटक ऍड. श्रध्दा बावीस्कर, शिवसेनेच. जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, शहर प्रमुख उमेश येरम, तालुका युवक प्रमुख स्वप्नील गावडे, आडेली विभाग प्रमुख मितेश परब, मनाली परब यासह महिला व शिवसैनिकांचा मोठ्या प्रमाणात सामावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.