कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मिरज-बेळगाव पॅसेंजर रेल्वेमध्ये महिलेची सोनसाखळी हिसकावली

12:22 PM Oct 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रवासी एकवटताच चेन टाकून भामट्याचे पलायन

Advertisement

बेळगाव : मिरजहून बेळगावला येणाऱ्या पॅसेंजर रेल्वेमध्ये चेनस्नॅचिंगचा प्रयत्न झाला आहे. शनिवारी सायंकाळी बेल्लद बागेवाडीजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली आहे. रेल्वेमध्ये मोबाईल चोरी वगळता इतर गुन्हे घटले होते. आता चेनस्नॅचिंगचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ माजली आहे. शनिवार दि. 4 ऑक्टोबर रोजी मिरजहून पॅसेंजर रेल्वेने बेळगावकडे येणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर सर्व प्रवासी एकवटताच भामट्याने तेथून पलायन केले आहे. रेल्वेतून उडी टाकून भामटा पळाला आहे. घटप्रभा रेल्वेस्थानकावर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी ही गोष्ट रेल्वे पोलिसांना सांगितली.

Advertisement

याच रेल्वेत प्रवास करणाऱ्या सहप्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बेल्लद बागेवाडी रेल्वेस्थानकावरून रेल्वे सुटताच एका महिलेच्या गळ्यातील चेन भामट्याने हिसकावली. तिचे तुकडे रेल्वेत पडले होते. प्रवाशांनी ते गोळा करून महिलेला दिले. आपण प्रवाशांच्या हाती सापडणार, हे लक्षात येताच भामट्याने धीम्या असलेल्या रेल्वेतून उडी टाकून पलायन केले आहे. यासंबंधी रविवारी बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता यासंबंधी एफआयआर दाखल झाला नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आजवर रेल्वेत बेकायदा दारू वाहतूक, अमलीपदार्थांची वाहतूक व मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. चेनस्नॅचिंगच्या घटना जवळजवळ कमी झाल्या होत्या. शनिवारी घडलेल्या या घटनेने प्रवाशांबरोबरच पोलीस यंत्रणाही हबकून गेल्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article