कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिनईघाटजवळ महिलेचा आढळला मृतदेह

12:42 PM Oct 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खून करून पुलाखाली टाकल्याचा संशय : मृत महिला नंदगड येथील रहिवासी

Advertisement

वार्ताहर/रामनगर

Advertisement

बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तिनईघाट मारसंगाळ क्रॉसजवळील पुलाखाली शनिवारी रात्री खानापूर तालुक्यातील नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेचा मृतदेह आढळून आला आहे. अश्विनी बाबुराव पाटील (वय 50, रा. दुर्गानगर, नंदगड, ता. खानापूर) असे मृत महिलेचे नाव असून त्या अंगणवाडी शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. रामनगर पोलिसांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला असून प्राथमिक तपासात महिलेच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार खून असल्याची शक्यता वर्तविली आहे. महामार्गावरून जाणारा ट्रकचालक ब्रिजखालील पाण्यात तोंड धुण्यासाठी उतरला असता अनोळखी मृतदेहाचे पाय निदर्शनाला आल्याने त्याने तातडीने रामनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. रामनगर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता सदर महिलेचा मृतदेह रॉडच्या सहाय्याने दगड बांधून पाण्यात सोडल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अश्विनी पाटील या 2 ऑक्टोबर रोजी नंदगड येथील संशयित आरोपीसमवेत गावातील टेम्पोतून कक्केरी येथील यात्रेसाठी गेल्या होत्या.

यात्रा आटोपल्यानंतर परत येताना बिडी येथे काम असल्याचे सांगून त्या टेम्पोतून उतरल्या. मात्र त्या घरी परतल्या नाहीत. रात्री उशिरापर्यंत त्यांचा काहीच संपर्क न झाल्याने मुलाने नंदगड पोलीस ठाण्यात दि. 2 रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र, मृत महिलेच्या मोबाईलवरून आपण बेंगळूरला जात असून सोमवारी येणार असल्याचाही मेसेज कुटुंबीयांना करण्यात आला होता. रविवारी पुन्हा पहाटे 6.18 वाजता ‘मी काय वापस येत नाही. माझी काळजी करू नका मला जीवाचा कंटाळा आलाय. मी कुणालाही त्रास देत नाही मी बरं वाईट करून घेणार तुम्ही सगळे आराम रहा, असा संदेश तिच्या मोबाईलवरून आला होता. परंतु सदर महिला पोलिसांच्या माहितीनुसार दि. 2 रोजी मध्यरात्री मृत झाल्याचे समजते तर नंदगड पोलिसांनी नंदगड गावातीलच संशयित आरोपीला शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेऊन पुन्हा सायंकाळी सोडून देण्यात आले होते. सदर संशयिताकडून मृत महिलेच्या घरच्यांना मेसेज करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. सदर महिलेचा मृतदेह रामनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत आढळल्याने या घटनेची नोंद रामनगर पोलीस स्थानकात झाली आहे. याप्रकरणी आरोपीला शोधण्यासाठी रामनगर पोलिसांची टीम तपास करत असून मृतदेह रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये शवचिकित्सा करून पुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article