For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मलकापूर शहरा नजीक कंटेनर खाली सापडून महिला जागीच ठार

07:34 PM Jan 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
मलकापूर शहरा नजीक कंटेनर खाली सापडून महिला जागीच ठार
Advertisement

अपघातानंतर ट्रक चालक पसार; पाच तास वाहतूक विस्कळीत; हदय हेलावणार दृश्य  घटना स्थळी नागरीकांची गर्दी

शाहूवाडी प्रतिनिधी

कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर मलकापूर शहरा नजिक शाळी नदीवर असलेल्या पुलावर कंटेनर खाली सापडून टेकोली शाहुवाडी तालुक्यातील टेकोली येथील उल्हाशीबाई यशवंत कांबळे वय 65 या महिला जागीच ठार झाल्या. बेदरकार कंटेनर चालवून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकाविरोधात शाहूवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. अपघात घडल्यानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला.

Advertisement

घटनास्थळावरून पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी कोल्हापूरच्या दिशेने कंटेनर रत्नागिरीच्या दिशेने जात होता. चालकाने बेदरकारपणे चालवलेल्या या रस्त्याच्या बाजूने चालत असलेल्या उल्हाशीबाई कांबळे या कंटेनरच्या मागील चाकाखाली सापडल्या. चालकाच्या बेदरकारपणे सदर महिला अपघातात जागीच ठार झाल्याची नोंद पोलीसांत झाली. तर घटनास्थळी देखील हीच चर्चा सुरू होती .अपघाताची घटना घडताच चालकाने कंटेनर मधून धूम ठोकली . कंटेनरच्या मागील बाजू खाली त्या सापडल्याने अपघात इतका भीषण होता सुमारे 50 मीटर अंतर सदर अपघातात महिला फरपटत गेल्याचं दिसत होतं. मलकापूरचा आठवडा बाजार दिवशी घटना घडल्याने शहरात  वाहतूक कोंडी झाली होती दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या.

Advertisement
Advertisement

.