For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालिंगा- पाडळी रोडवर टेम्पोची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जागीच ठार

04:34 PM May 18, 2024 IST | Abhijeet Khandekar
बालिंगा  पाडळी रोडवर टेम्पोची दुचाकीला धडक  दुचाकीस्वार जागीच ठार
Advertisement

कसबा बीड 

Advertisement

करवीर तालुक्यातील बालिंगा- पाडळी रोडवर दुचाकीची टेम्पोला समोरून जोरदार धडक बसल्याने दुचाकीस्वाराचा मृ्त्यु झाला. पाडळी गावचे भाऊसो कृष्णात पाटील असं मयताचं नाव असून सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त कोल्हापुराला जात असतानाही घटना हा अपघात घडला.

कोल्हापुरातील मार्केट यार्डात कामाला असलेले भाऊसो पाटील आज नेहमी प्रमाणे आपल्या दुचाकीवरून कोल्हापुरात कामासाठी जात होते. पाडळी खुर्द गावातील आंबेडकर चौकात समोरून भरधाव वेगान आलेल्या टेम्पोची त्यांच्या दुचाकीला जोराची धडक बसली. या अपघातात भाऊसो पाटील हे दूर फेकले गेल्याने रस्त्यावर आपटून त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. प्रचंड रक्तस्त्राव झाल्यान ते बेशुद्ध झाल्याने त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये पळवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केलं सांगितलं.

Advertisement

भाऊसो पाटील यांचा अपघात झाल्याच समजताच ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. या अपघाताची नोंद करवीर पोलिसात झाली आहे.

Advertisement
Tags :

.