मातृत्वानंतर महिलेला अजब आजार
अन्न पाहिल्यावर उपाशी असल्याप्रमाणे पडते तुटून
आई होण्याचा आनंद अनेकदा अडचणी आणि आजार घेऊन येतो. इंग्लंडच्या केंट येथील 32 वर्षीय नर्सरी टीचर बेक्का गॉडर्डसोबत असेच घडले आहे. मुलाला जन्म दिल्यावर बेक्का पोस्ट-पार्टम डिप्रेशन आणि बिंग-इटिंग डिसऑर्डरची शिकार ठरली आहे. या अजब आजारामुळे बेक्काला स्वत:ला काहीही खाण्यापासून रोखता येत नाही आणि तिचे वजन आता नियंत्रित करणे अवघड ठरले आहे. अन्न पाहताच बेक्का त्यावर तुटून पडते. परंतु आता तिने स्वत:ला या आजारातून बाहेर काढण्याचा निर्णय घेत स्वत:चे आयुष्य बदलले आहे. तिने तुर्कियेमध्ये 4 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करत गॅस्ट्रिक स्लीव सर्जरी करविली. यामुळे तिचे वजन 38 किलोंनी कमी झाले. वजन कमी झाल्याने ती आता अधिक तंदुरुस्त आणि आनंदी आहे.
बेक्का गॉडर्डचे वजन पोस्ट-पार्टम डिप्रेशननंतर 90 किलोपर्यंत पोहोचले होते. तर तिची उंची केवण् 5 फूट आहे. बेक्काला बिंग-ईटिंग डिसऑर्डर होता, जो खाण्याशी निगडित दुर्लभ आजार आहे. मी जेव्हा कंटाळू लागते, खाण्यास सुरुवात करते. माझे पोट कधीच भरलेले वाटत नाही. खाणे हीच माझी सवय ठरले हेते असे ती सांगते.
केक, बिस्किट आणि चॉकलट माझी कमजोरी होते, यामुळे माझे मानसिक आरोग्य आणखी बिघडले. 2010 मध्ये पहिल्या मुलीच्या जन्मानंतर माझे वजन लवकरच सामान्य झाले हेते. परंतु 2015 मध्ये दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर नैराश्य आणि वजन वाढू लागले. आनंद असो किंवा दु:ख मी खाण्यात समाधान शोधत होते. 2017 मध्ये आरोग्य समस्या आणि एका कार दुर्घटनेने माझी स्थिती आणखी खराब झाली. 2021 मध्ये तिसऱ्या मुलीच्या जन्मानंतर वजन 90 किलोवर पोहोचल्याचे ती सांगते.
मी खाण्यावर निर्भर झाली होती, जोपर्यंत आजारी पडत नाही तोवर खात होते असे तिने सांगितले. बेक्काला उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर, पाठदुखीची समस्या होती. ती मुलांसोबत पार्कमध्ये खेळू शकत नव्हती. कारण तिला थकवा जाणवत होता, मग तिने प्लस-साइज ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेत यश मिळविले. परंतु स्थिती बदलण्यासाठी 2024 मध्ये तिने तुर्कियेत शस्त्रक्रिया करविली. यामुळे तिचे वजन 38 किलोंनी कमी झाले. मला माझा आहार आणि अन्नाशी नाते पूर्णपणे बदलावे लागले. शस्त्रक्रियेनंतर रक्तदाबाची समस्या दूर झाली, फॅटी लिव्हर अन् पाठदुखीही नाहिशी झाल्याचे ती सांगते.